कोरोना व्हायरसः सांगलीमधल्या आणखी 12 जणांना लागण

फोटो स्रोत, Getty Images
सांगली जिल्ह्यातल्या आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट आज स्पष्ट झालं आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 147 वर गेली आहे.
आज सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांना घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना बरा होतोच. घाबरून जाऊ नये, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

मास्क फक्त रुग्ण आणि डॉक्टरांच्या उपयोगासाठी आहे असं सांगत आरोग्यसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर तरतूद करणाार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आरोग्य विभागाचे जनसंपर्क अधिकारी अनुप यादव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "सांगलीमध्ये आणखी 12 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सांगलीत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 21 झाली आहे. सुरुवातीला चार दिवसांपूर्वी परदेशाहून परत आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्या संपर्कात त्यांचेच पाच कुटुंबीय आल्याने त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता नव्याने 12 रुग्ण मिरज येथील रुग्णालयात दाखल झाले आहेत."
खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत - राजेश टोपे
खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत. महासंकटाच्या काळात असंवेनशीलता दाखवू नका, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
नागरिकांनी रक्तदान करण्यांचं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.
सध्याच्या रुग्णांच्या जवळच्या व्यक्तींची तपासणी करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचा नियम कुणीही मोडू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
गरिब घटकांसाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. तसंच अत्यंत शिस्तीने त्यांनी रेशनचं धान्य घेऊन जावं, असंही त्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























