कोरोना व्हायरसः गर्दी टाळा, शक्य असल्यास विवाहसोहळे पुढं ढकला- अजित पवार

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करणं टाळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. पुणे जिलह्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. लग्नसमारंभ, विविध कार्यक्रम आणि अंत्यविधी अशा प्रसंगी गर्दी टाळावी असे अजित पवार यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारचं संकट येतं तेव्हा त्याचा मुकाबला करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. हे आपलं कर्तव्य आहे असं समजून लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 52 वर गेल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोना
Banner

दरम्यान आज सकाळी लोकांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा या शहरांमध्ये सरकारनं अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. या शहरांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्वकाही 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

पण, मुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पण 31 मार्च पर्यंत राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय सकारनं घेतल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. शिवाय काम बंद राहीलं तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुंबई एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा या शहरांमध्ये समावेश आहे.

तसंच राज्यात पहिली ते आठवची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. तसंच 9वी आणि 11 वीचे उरलेल पेपर 15 एप्रिल नंतर होणार आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)