नरेंद्र मोदी हे प्रतिभावान आणि दूरदृष्टी असेलेले नेते - न्या. अरुण मिश्रा

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

नरेंद्र मोदी हे प्रतिभावान आणि दूरदृष्टी असेलेले नेते असल्याचं मत सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी व्यक्त केलं.

तसंच, 1500 जुने कायदे रद्द केल्याबाबत न्या. मिश्रांनी पंतप्रधान मोदी आणि विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं कौतुक केलं.

आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषद 2020 मध्ये भाषण करताना न्या. मिश्रा म्हणाले, "जागतिक दृष्टिकोन ठेवून तळागाळात काम करणाऱ्या प्रतिभावान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरील समूहाचा एक जबाबदार सदस्य देश आहे."

न्या. मिश्रा यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील त्रुटी दूर व्हाव्यात आणि न्यायाव्यवस्था आणखी सदृढ व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले, "आता आपण एकविसाव्या शतकात आहोत. आता आपल्याला केवळ वर्तमानासाठीच नव्हे, तर भविष्यासाठाही आधुनिक रचनेची आवश्यकता आहे. न्यायव्यवस्था लोकशाहीचा कणा आहे आणि तो मजबूत करणं ही आजची गरज आहे."

यावेळी न्या. मिश्रांनी जागतिकीकरणाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "लोकांना आपण पिछाडले गेलो आहोत ही भावना त्रस्त करत आहे तसेच आपण जागतिकीकरणाच्या लाभांपासून वंचित राहिलोत अशी भावना त्यांच्या मनात बळकट होत आहे. ही भावना कोरोना व्हायरसइतकी धोकादायक होण्याआधीच आपण याकडे लक्ष द्यायला हवं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)