You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपने राज्यसभा खासदारांसाठी जारी केला 3 ओळींचा व्हीप
भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राज्यसभेतील सर्व खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. मंगळवारी राज्यसभेत उपस्थित राहून सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे.
व्हीप जारी केला याचा अर्थ खासदारांना कोणत्याही परिस्थितीत सदनात उपस्थित राहून पक्षाला पाठिंबा द्यावाच लागतो. त्याचं उल्लंघन केल्यास त्यांना खासदारकी गमवावी लागू शकते.
आज दिल्ली विधानसभेचा निकालही असून, सर्व एक्झिट पोल्समध्ये आपला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत.
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. सध्या या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.
त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या उत्तराच्या समर्थनार्थ जारी केला असावा किंवा एखाद्या विधेयकावर मतदान घेण्याचा कयास लावला जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या आधी सरकारने सांगितलं होतं की या अधिवेशनात 45 विधेयकं संमत करण्याचा इरादा आहे.
जेवणाची सुटीही नाही
मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर संसदेची कार्यवाही 2 मार्च पर्यंत स्थगित राहील.
राज्यसभेत मंगळवारी जेवणाची सुटी होणार नाही, अशीही घोषणा करण्यात आली आहे. आता भाजपने व्हीप जारी केल्यामुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप काय करू इच्छिते हे अद्याप स्पष्ट नाही. पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)