You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर: अनंतनागमध्ये उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला, 10 जखमी
भारत शासित काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस आणि एका पत्रकारासह 10 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी एक ट्वीट करत म्हटलं की कट्टरतावाद्यांनी उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
परिसरात नाकाबंदी करून शोध मोहीम हाती घेण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
कट्टरतावाद्यांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला अनंतनागच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त असलेल्या डीसी कार्यालयाबाहेर एका गस्ती पथकावर ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रेनेड रस्त्याच्या कडेला जाऊन फुटला आणि त्यातून निघालेल्या छर्ऱ्यांनी तिथे उभे असलेले लोक जखमी झाले.
अजून कुठल्याही संघटनेने किंवा व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
जवळपास दोन महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आलं. राज्यघटनेतल्या कलम 370 मुळे या राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळाला होता. तो आता काढून घेण्यात आला आहे. कलम रद्द केल्यानंतर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी अजूनही थोड्याफार प्रमाणात लागू आहे.
भारत सरकारने उचलेलल्या या पावलामुळे राज्यात अशांततेचं वातावरण निर्माण होईल, या भीतीमुळे राज्यातल्या फुटीरतावादी आणि राजकीय नेत्यांना स्थानबद्धही करण्यात आलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)