You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान: इस्लामाबादजवळ आणि पाक-प्रशासित काश्मीरमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप
पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तसंच पाक-प्रशासित काश्मीरमध्ये मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के बसले. यात जवळपास 22 जणांचा मृत्यू झाला आहे तर 300 जणांना दुखापत झाली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
United States Geological Surveyनुसार, भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती आणि भूकंपाचं केंद्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम शहरापासून 5 किमी अंतरावर होतं.
पाकिस्तानच्या हवामान विभागानुसार, "पाकिस्तानच्या वेळेनुसार दुपारी 4.43ला एक भकंपाचा धक्का बसला. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात हे धक्के जाणवत होते."
यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, लाहोर, पेशावर या शहरांमध्ये नुकसान झालं आहे.
दिल्लीसहित भारतातल्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. असं असलं तरी, भारतात काही नुकसान झाल्याची बातमी आलेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचं मदतकार्य सुरू आहे. मात्र पाकिस्तानात मुत्युमुखी पडलेल्यांच्या आकडेवारीविषयी संभ्रम आहे.
पाकिस्तान प्रशासित काश्मीरचे पोलीस डायरेक्टर जनरल गुलफराज खान यांनी सांगितलं, "भूकंपाच्या धक्क्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 22 इतकी आहे, तर 300हून अधिक जण जखमी झाले आहेत."
तर नैसर्गिक आपत्तीवेळी बचावकार्य करणाऱ्या पाकिस्तानच्या NDMAचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल मोहम्मद अफजल यांनी म्हटलंय, "आतापर्यंत 10 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे तर 100 जण जखमी झाले आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)