सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप, नरेंद्र मोदींना अश्रू अनावर

माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये अर्थात 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी दुपारी साडेचार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.
त्यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलं. त्यानंतर लोधी रोडवरील विद्युतदाहिनीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी सुषमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

फोटो स्रोत, ANI
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भाजप आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. हरियाणा सरकारने सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची आदरांजली
'सुषमाजी भारतीय संस्कृतीचं प्रतीक होत्या. त्या सक्षम प्रशासक आणि संवेदनशील नेत्या होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश दु:खी आहे. त्यांनी देशवासीयांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. याक्षणी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत', असं लोकसभा ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.
त्या इस्राइलच्या मित्र-इस्राइलचे राजदूत
भारतातील इस्राइलचे राजदूत रॉन मैल्का यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. 'इस्राइल आणि देशवासीयांकडून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे. त्या खंबीर नेत्या आणि इस्राइलच्या स्नेही होत्या. इ्स्राइल-भारत मैत्रीपर्व पुढे नेण्यात सुषमा यांची मोलाची भूमिका होती', असं मैलका यांनी सांगितलं.
सुषमाजींच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी-अमित शहा
सुषमा स्वराज यांच्या निधनाने भाजपचे कोट्यवधी कार्यकर्ते तसंच देशभरातील कोट्यवधी चाहते दु:खी आहेत. भारतीय राजकारणासाठी हा प्रचंड मोठा धक्का आहे. आणीबाणीच्या काळापासून देशाच्या राजकारणातील त्या गौरवशाली पर्व होत्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या, विविध खात्यांच्या मंत्री म्हणून त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी कुशल प्रशासक म्हणून काम केलं. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढणं अवघड आहे. त्यांच्या लोकसेवेकरता देश त्यांना सदैव स्मरणात ठेवेल असं अमित शहा यांनी सांगितलं.
लालकृष्ण अडवाणी झाले भावुक
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवाणी यांचे ऋणानुबंध घनिष्ठ होते.
नरेंद्र मोदींना अश्रू अनावर
पंतप्रधान नरेद्र मोदींनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. यावेळी नरेंद्र मोदींबरोबर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूसुद्धा उपस्थित होते.

फोटो स्रोत, ANI
सर्वांत जवळच्या सहकारीचं निधन - अडवाणी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी एक पत्रक जारी करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यांचा आठवणींना उजाळा दिला आहे.
"माझ्या सर्वांत जवळच्या सहकारी सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं मी खूप दुःखी आहे. 80 च्या दशकात त्यांनी त्यांची कारकिर्द सुरू केली, त्यानंतर अल्पावधीतच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांना स्थान मिळालं. महिला नेत्यांसाठी त्या रोल मॉडेल ठरल्या. त्या उत्तम वक्ता होत्या."
"त्या अत्यंत संवेदनशील व्यक्ती होत्या. आपल्या स्वभावामुळे त्या सर्वांची मनं जिंकत. मला एकही असं वर्ष अठवत नाही जेव्हा त्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट केक घेऊन आल्या नाहीत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनी शोक व्यक्त केला आहे. सुषमा स्वराज यांच्या जाण्याचे मी दुःखी आहे, असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हामिद करझईंनी वाहिली श्रद्धांजली
अफगाणीस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझई यांनी सुषमा स्वराज यांच्याबरोबचा फोटो ट्वीट करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रिपद सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.
मंगळवारी संध्याकाळी प्रकृती बिघडल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना दाखल केल्यानंतर काही वेळातच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, हर्षवर्धन, पियूष गोयल एम्समध्ये पोहचले होते. काही वेळेतच त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.
काही तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर काश्मीरसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. "प्रधानमंत्रीजी आपका हार्दिक अभिनंदन. मैं अपने जीवन में इस दिन को देखले की प्रतीक्षा कर रही थी." असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलंय की सुषमा स्वराज या अतिशय उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झालं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
सुषमा स्वराज यांच्या जाण्याने धक्का बसल्याचे शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं ट्वीट करत राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमाजींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 9
"मोठा धक्का. सुषमाजींच्या निधनाने भारताने एक खंबीर आणि प्रभावशाली नेता गमावला. सर्वोत्तम नेत्या. अमोघ वक्तृत्व. राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्या. विन्रम व्यक्तिमत्व. त्यांचं निधन हा माझ्यासाठी वैयक्तिक आघात आहे. सुषमाजींची भाषणं ऐकत मी लहानाचा मोठा झालो. त्यांचं बोलणं मला आजही प्रेरित करतं. त्यांनी सदैव मला मार्गदर्शन केलं," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 11
भाऊ कसे आहात?
मी नेहमी त्यांना विचारायचो की ताई तशा आहात, आणि विचारायच्या भाऊ तुम्ही कसे आहात? आज मी एक बहीण गमावली आहे, अशी शब्दांमध्ये काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"सुषमा स्वराज यांचं निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली," अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 12
"त्या माझ्यासाठी मोठ्या बहिणी सारख्या होत्या, त्यांनी एका लहान भावा प्रमाणे मला शिकवलं आहे, ट्रिपल तलाक आणि कलम 370 बाबत त्या खूष होत्या. त्यांनी पक्षाला फार पुढे नेलं आहे," अशा शब्दांमध्ये कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुषमा स्वराज यांची कमी कुणीच भरून काढू शकत नाही, त्यांनी जगभरात भारताची इज्जत वाढवली आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
जॉर्ज यांचा हातकड्यातील फोटो मुजफ्फरपूरमध्ये फिरवला होता
एक प्रभावी वक्ता ही सुषमा स्वराज यांची ओळख होती. लालकृष्ण अडवाणी सुषमा स्वराज यांचे राजकीय गुरू मानले जातात. गेल्या दशकभरात त्यांनी 11 निवडणुका लढवल्या. त्या तीन वेळा आमदार राहिल्या तर सात वेळा खासदार राहिल्या.
आणिबाणी दरम्यान बडोदा डायनामाईट केसमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांनी तुरुंगातूनच मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवली. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी हातकड्या घातलेला जॉर्ज यांचा फोटो संपूर्ण मतदारसंघात फिरवून प्रचार केला होता.

फोटो स्रोत, www.georgefernandes.org
आणिबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत हरियाणातून सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1977 मध्ये त्या हरियाणा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांचा हरियाणाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
1990 मध्ये त्यांनी राज्यसभेत प्रवेश करून राष्ट्रीय राजकारणाला सुरवात केली. 1996 मध्ये त्या लोकसभेवर निवडून आल्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. दीर्घकाळ त्यांनी माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)