तापसी पन्नूनं ट्विटरवर जाहीरपणे छेड काढणाऱ्याला असं दिलं उत्तर

तापसी पन्नू

फोटो स्रोत, Taapsee Pannu/ facebook

फोटो कॅप्शन, तापसी पन्नू
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

"तापसी, मला तुझ्या शरीराचे अवयव आवडतात," असं अकू पांडे नावाच्या व्यक्तीनं ट्वीट केलं आहे.

या ट्वीटला उत्तर देताना अभिनेत्री तापसी पन्नूनं म्हटलं आहे की, "मलाही माझे अवयव खूप आवडतात. सेरेब्रम माझा सर्वाधिक आवडता अवयव आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यानंतर एका ट्वीटर वापरकर्त्यांनं तापसीला टॅग करत म्हटलं आहे की, "तापसीच्या ट्वीटनंतर सेरेब्रम हा शब्द गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे."

राहुल ट्वीटर

फोटो स्रोत, Rahul/TWITTER

सेरेब्रमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही मनोविकार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे यांच्याशी संपर्क साधला.

सेरेब्रम म्हणजे काय?

सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू. याचा अर्थ बुद्धिमत्ता असा होतो. तापसीनं सेरेब्रम आवडतो असं सांगितलं याचा अर्थ तिला स्वत:ची बुद्धिमत्ता सर्वांत जास्त आवडते.

सेरेब्रमचं कार्य काय?

खरं तर तापसीनं सेरेब्रम ऐवजी neo-cortex हा शब्द वापरायला हवा होता. आपल्या कपाळाच्या मागे मेंदूचा जो भाग असतो त्याला neo-cortex असं म्हणतात.

आपली बुद्धिमत्ता, शहाणपण, निर्णय घेण्याची क्षमता, विचार करण्याची पद्धत हे सर्व neo-cortexवर अवलंबून असतं.

मेंदूचे वेगवेगळे भाग कोणते?

Reptilian brain आणि Mammalian brain हे दोन ब्रेन सगळ्यांकडेच असतात. पण तापसीनं उल्लेख केलेला सेरेब्रम ब्रेन हा व्यक्तीच्या चांगल्या आणि प्रगत अवस्थेत असतो.

हालचालीवर नियंत्रण ठेवणारा मेंदू म्हणजे Reptilian brain तर भावनांवर नियंत्रण ठेवणारा मेंदू म्हणजे Mammalian brain.

तापसीच्या उत्तराबद्दल काय वाटतं?

तापसीनं दिलेलं उत्तर योग्य आहे. लोकांची जेवढी समज असते तेवढचं त्यांना दिसत असतं.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

तापसी पन्नूच्या या उत्तरावर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्वीटर

फोटो स्रोत, Venkatesh Banginwar/TWITTER

व्यकंटेश बंगीनवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "ट्वीटरचा योग्य वापर कशासाठी आहे, याच्या शोधात मी आहे. दररोज लोक ट्वीटरचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करत आहे. जसं आज मला Voyeur हा शब्द ट्वीटरमुळे समजला.

आजपर्यंत मला तापसीचा अभिनय आवडत होता, आता तर तिचा सेरेब्रमही आवडायला लागला आहे."

ट्वीटर

फोटो स्रोत, YUSH BANA/TWITTER

युश बना यांनी त्यांचा स्वत:चा आवडता अवयव सांगितला आहे. ते म्हणतात, "मला माझं हृदय सर्वांत जास्त आवडतं."

ट्वीटर

फोटो स्रोत, TWITTER

"अकू पांडे नावाच्या या व्यक्तीला 9 फॉलोअर्स आहेत. त्यानं ट्वीटच्या माध्यमातून एका अभिनेत्रीची जाहीररित्या छेड काढली आहे. त्या व्यक्तीच्या ट्वीटचा उद्देश काय आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. आपल्या लोकांच्या मानसिकतेत काहीतरी खूप वाईट घडत आहे. मुक्त आणि वेगानं उपलब्ध असणाऱ्या इंटरनेटचा हा परिणाम आहे," असंही एका ट्वीटर वापरकर्त्यानं म्हटलं आहे.

मुकेश बवारिया यांनी मात्र अकू पांडेचं जुनं ट्वीट शेयर करत म्हटलं आहे की, "त्याची आवडती अभिनेत्री तर दिशा पटनी आहे."

ट्वीटर

फोटो स्रोत, MUKESH BAVARIYA

डिंपी बारुआ यांनी ट्वीटरवरील प्रतिक्रियेत लिहिलं आहे की, "काही लोक असे असतात ज्यांना फक्त इतरांना ट्रोल करायचं असतं. मग समोर सेलिब्रिटी असो की सामान्य मुलगी, त्यांचा उद्देश फक्त ट्रोल करणं इतकाच असतो. लोकांचं ध्यान आकर्षित करण्यासाठी ते सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडतात."

ट्वीटर

फोटो स्रोत, Dimpy Baruah/twitter

"तापसी आणि अकू यांचं संभाषण हे एखाद्या चित्रपटाचा भाग असायला हवं," असं मोहम्मद झफर यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)