केदारनाथ : 'लव जिहाद'चा वाद पुन्हा उकरून काढला जातोय का?

फोटो स्रोत, Getty Images
सारा अली खानचा डेब्यू असणारा केदारनाथ सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे.
जून २०१३मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयावर 'केदारनाथ' हा चित्रपट आधारित आहे. 'इस साल करेंगे प्रकृति के क्रोध का सामना और साथ होगा सिर्फ प्यार' ही या चित्रपटाची टॅगलाईन आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर म्हणजेच शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं आहे. तर तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भुमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटात सारा ही मुक्कू नावाच्या श्रीमंत हिंदू घरातल्या मुलीची भूमिका साकारत आहे. तर सुशांत सिंह राजपूत हा मंसूर नावाच्या गरिब मुस्लीम घरातल्या मुलाची भूमिका निभवाताना दिसतोय.
नेमका वाद काय आहे?
या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे. तसंच हिंदूंच्या धार्मिक स्थळांचा अवमान केला जात असल्याचा या संघटनांचा आरोप आहे.
हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, असा दावा केदारनाथ मंदिरातल्या पुजाऱ्यांनी केला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तर काही दिवसांपूर्वी सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात चित्रपटाविरेधात निदर्शनं केली होती.
या चित्रपटाविरोधात उत्तराखंड, मुंबई आणि गुजरात अशा तीन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं. ट्रेलर पाहून केदारनाथमधील नयनरम्य स्थळं आणि दृश्य या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतील यात काहीच शंका नाही. पण हा चित्रपट हिंदूंच्या धर्मिक भावना दुखावणारा आहे, असा दावा करत चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
किसिंग सिनला विरोध
केदारनाथच्या ट्रेलरमध्ये सारा अली खान आणि सुशांत सिंगचा किसिंग सिन दाखवण्यात आला आहे. यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे.
आतंरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने सारा अली खान आणि सुशांत सिंगचा किसिंग सिन केदारनाथसारख्या हिंदूंच्या पवित्र तिर्थस्थळी दाखवणं गैर असल्याचं म्हटलं आहे. तसंच, हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा करत आतंरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडियावरही अनेकांनी आपली नाकं मुरडत #BoycottKedarnathMovie हॅशटॅगसह प्रतिक्रियांचा भडिमार केला आहे.
उत्तराखंडच्या महाप्रलयात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले होते. अशा पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या 'केदारनाथ'च्या ट्रेलरमध्ये सारा अली खान आणि सुशांत सिंगचा किसिंग सिन दाखवण्यात आला आहे. यावर हिंदू जागृती संस्थेने आक्षेप घेतला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भाजप नेते अजेंद्र अजय यांनी देखील सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. 'लव जिहाद'ला हा चित्रपट प्रोत्साहन देत असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
सोनम महाजन यांनी @AsYouNotWish नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून, "मक्कामधल्या मशिदीवरही क्रेन कोसळून शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मग त्यांच्यावरही तिथे जाऊन असाच चित्रपट बानवा की," असं मत व्यक्त केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
तर अभिनव प्रकाश यांनी या चित्रपटाची कथा मुळात असंवेदनशील आणि वाईट असल्याचं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
हिमांशू नारायण यांनी मात्र या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून मला काल्पनिक आणि वास्तविक कथा यामधला फरक कळतो. त्यामुळे मला यात काहीच गैर वाटत नाही, असं म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
लव्ह जिहादच्या आरोपांवर साराचं सडेतोड उत्तर
या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सारा अली खाननं मात्र विरोधकर्त्यांचे सर्व दावे खोडून काढले आहेत.
"हा चित्रपट तसा नाही आहे. यामध्ये केदारनाथ जितकं मुक्कू (सारा)चं आहे तितकचं ते मंसूर (सुशांत)चं दाखवण्यात आलं आहे. या सगळ्या गोष्टी पसरवणाऱ्यांचा हेतू मला समजत नाही. वंशवाद आणि लिंगभेद योग्य नाही," असं साराने म्हटलं आहे. आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आमचा सिनेमा लव्ह जिहादला अजिबात प्रमोट करत नाही. उलट तो जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देतो, असंही तिने पुढे म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)