स्लॅब तुटून विहिरीत पडलेल्या 35 भाविकांचा मृत्यू

Published

मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये एका मंदिरात रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली. मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीचं स्लॅब कोसळलं आणि त्यात अनेक भाविक पडले. सध्या बचावकार्य वेगानं सुरू आहे.

ही घटना इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात घडली आहे. मंदिरातील कार्यक्रमासाठी आलेले लोक विहिरीच्या स्लॅबवर बसले होते. त्यावेळी त्यांच्या वजनानं हे छत कोसळलं आणि लोक त्यात पडले.

राज्य सरकारनं तातडीनं इथं बाचवकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 35वर पोहोचला आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस आणि नगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सध्या तकी नेमके किती लोक या विहिरीमध्ये अडकले आहेत याची माहिती देण्यास प्रशासनानं नकार दिला आहे. लोकांना वाचवणं ही त्यांची प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या घटनास्थळी अफरातफरीची स्थिती आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसंच त्यांना बचावकार्यात वेग आणण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेची दखल घेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राज्य सरकार बचावकार्य आणि मदतकार्य वेगात करत असल्याची माहिती मोदींनी दिली.

या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रार्थनाही केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)