इरा खानचा साखरपुडाः पुण्यातला नुपूर होणार आमीर खानचा जावई

फोटो स्रोत, Ira Khan
आमीर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा पार पडला आहे. या समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इरा खान ही आमीर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे.
साखरपुड्याला आमीर खान, आई रीना दत्ता, अमीर खानची दुसरी बायको किरण राव, अमीर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान, आणि आजी झीनत हुसैन उपस्थित होते.
नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. त्याने इराला काही महिन्यांपूर्वी एका इव्हेंटमध्ये प्रपोज केलं होतं. त्यांनी या प्रसंगाचा व्हीडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले होते.
नुपूर शिखरे मुळचा पुण्याचा आहे. त्याचं शालेय शिक्षण पुण्यात आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं आहे. तो सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. 2021 च्या व्हॅलेंनटाईन डे ला या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली होती.

इरा खान ने दिली होती लैंगिक अत्याचाराची कबुली
सहा वर्षांपूर्वी तिने मानसिक आरोग्याबाबत आपले विचार मांडले होते. यावेळी तिने बाललैंगिक अत्याचाराबाबत पोस्ट टाकली होती.
आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते की 'लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे मला काही काळ नैराश्याचा सामना करावा लागला.'
"मी चौदा वर्षांची होती. तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. ही जराशी विचित्रच परिस्थिती होती कारण मला हेच कळत नव्हतं की ती व्यक्ती हे मुद्दामहून करत आहे की तिच्याकडून ते चुकून होत आहे. असं रोज घडत नव्हतं."
पुढे ती सांगते की "मी याबाबत माझे वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता यांच्याशी बोलले. त्यांनीच मला या बिकट परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवला."
"ती व्यक्ती माझ्यासोबत नेमकं काय करत आहे हे समजून घेण्यासाठी मला एक वर्ष लागलं. पण जेव्हा मी माझं मन पक्कं केलं त्यावेळी मी लगेच माझ्या आई-वडिलांना इमेल केला. आणि या परिस्थितीतून बाहेर आले."
"माझा भूतकाळ मला सतावत नाही. मी आता त्या गोष्टीला घाबरत नाही. मी असा विचार करते की माझ्यासोबत हे आता तर होत नाहीये ना. माझा भूतकाळ मी केव्हाच पाठीमागे टाकलाय. मी जेव्हा 18-20 वर्षांची होते तेव्हा या गोष्टीच्या वेदना होत असत," असं इराने म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























