भगतसिंह कोश्यारांना राज्यपालपदात 'दु:ख', शरद पवारांनी मारला टोमणा

भगतसिंह कोश्यारांना राज्यपालपदात 'दु:ख', शरद पवारांनी मारला टोमणा
Published

'राज्यपाल होण्यात दु:खच दु:ख आहे, सुख काही नाही' असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलंय, त्यावर शरद पवारांनीही मिष्किल प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत राजभवनातील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे राज्यातील पवित्र जैन तीर्थ दर्शन सर्किट विकास करण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला.

त्यावेळी बोलताना कोश्यारींनी आपल्या मनातंल दुःख बोलून दाखवलं.

"राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र असे लोक येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. "

खरंतर महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. राज्यपालांना हटवण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून होते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे हे उद्गार परतीचे संकेत तर नव्हे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे.