शाहरुख खानला मुंबई विमानतळावर रोखलं; कस्टम्सने ठोठावला 7 लाखांचा दंड

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेता शाहरुख खान याला मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी रोखलं. कस्टम्स अधिकाऱ्यांनी शाहरुखला 7 लाखांचा दंड ठोठावला. शुक्रवारी रात्री शाहरुख खान शारजाहून भारतात परतला.
मुंबई विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्याला अडवलं. चौकशीदरम्यान शाहरुखकडे महागड्या घड्याळांचा संच आढळला. या सगळ्या घड्याळ्यांची किंमत 18 लाख रुपये होती. याकारणापायी शाहरुखला 6.83 लाख रुपयांची कस्ट्म्स ड्युटी भरावी लागली.
शाहरुखच्या बॅगेत बाबुन अँड जुर्बक, रोलेक्सची सहा घड्याळ्यांचे 6 डबे, स्पिरीट ब्रँडची घड्याळं, अपल सीरिजची घड्याळं होती. घड्याळ्यांचे रिकामे बॉक्सही होते.
शाहरुखच्या बॉडीगार्डने भरले पैसे
विमानतळावर खूप वेळ यासंदर्भातील कारवाई सुरू होती. कारवाई पूर्ण झाल्यावर शाहरुख खान आणि व्यवस्थापक पूजा ददलानी यांना जाऊ देण्यात आलं.
शाहरुखचे बॉडीगार्ड रवी आणि बाकी सदस्यांना रोखण्यात आलं. शाहरुखचा बॉडीगार्ड रवीनेच 6 लाख 87 हजार रुपयांची कस्टम्स ड्युटी भरली. सकाळी 8 वाजता सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कस्टम्स अधिकाऱ्यांनी रवीला विमानतळावरून बाहेर जाऊ दिलं.
11 नोव्हेंबरला शाहरुख युएईमधल्या एक्स्पो सेंटर इथे आयोजित शारजा इंटरनॅशनल बुक फेयरसाठी निमंत्रित होता.
बुक फेअरच्या 41व्या आवृत्तीत शाहरुखला ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नरेटिव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शाहरुख आपल्या चमूलाही खाजगी विमानाने घेऊन गेले होते. याच विमानाने शुक्रवारी रात्री शाहरुख मायदेशी परतला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.
























