अभिनेते नितेश पांडे यांचं निधन, इगतपुरीच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले

नितेश पांडे

फोटो स्रोत, instagram

फोटो कॅप्शन, नितेश पांडे
Published

हिंदी चित्रपट आणि मालिका अभिनेते नितेश पांडे यांचं निधन झालं आहे. आज (24 मे) नाशिकच्या इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये नितेश पांडे हे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

51 वर्षीय नितेश यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या नाशिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून नितेश यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झाल्यानंतर सविस्तर माहिती समोर येईल.

नितेश हे एका चित्रीकरणासाठी इगतपुरी येथे आले होते. मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास ते इगतपुरीच्या हॉटेलमध्ये दाखल झाले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, नितेश यांचे मेहुणे आणि चित्रपट निर्माते सिद्धार्थ नागर यांनी त्यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली.

त्यांनी म्हटलं, "तुम्ही ऐकलं ते खरं आहे. माझे भाऊजी आता या जगात नाहीत. माझी बहीण अर्पिता पांडे हिला खूप मोठा धक्का बसला आहे. नितेश यांचं पार्थिव आणण्यासाठी त्यांचे वडील इगतपुरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते दुपारपर्यंत मुंबईला पोहोचतील. आम्ही त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःखात आहोत. मी बहीण अर्पिता हिच्याशीही बोलू शकलो नाही.

नितेश यांची अभिनय कारकिर्द

नितेश पांडे हे अनुपमा या हिंदी मालिकेत काम करत होते. या मालिकेत त्यांनी रुपाली गांगुली साकारत असलेल्या अनुपमा या पात्राच्या मैत्रिणीचा नवरा धीरज कपूर यांच्या भूमिकेत काम केलं.

याशिवाय इंडियावाली माँ आणि इतर अनेक मालिकांमध्ये ते दिसले.

नितेश पांडे

फोटो स्रोत, instagram

नितेश यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी उत्तराखंडच्या नैनितालमध्ये झाला होता. 1990 च्या दशकात एक अभिनेता म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली.

सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. . त्यानंतर हळूहळू त्यांनी टीव्ही आणि चित्रपटांमध्येही काम मिळत गेलं.

नितेश पांडे

फोटो स्रोत, instagram

नितेश पांडे यांना त्यांच्या 'खोसला का घोसला' चित्रपटातील मॅनेजरच्या रोलमधून जास्त लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी ओम शांती ओम, दबंग 2, बधाई दो यांच्यासारख्या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका केल्या

नितेश यांच्या कौटुंबिक जीवनाबाबत बोलायचं झाल्यास त्यांचा पहिला विवाह 1998 मध्ये अश्विनी काळसेकर यांच्याशी झाला होता. 4 वर्षांच्या संसारानंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर नितेश यांनी टीव्ही अभिनेत्री अर्पिता पांडे यांच्यासोबत 2003 साली विवाह केला होता.

अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघाती मृत्यू

साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेत जॅस्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं चंदीगढजवळ एका अपघातात निधन झालं आहे.

हा अपघात 22 मे रोजी हिमाचल प्रदेशात एका घाटात झाला. वैभवीचा मृतदेह मुंबईत आणण्यात येत असून तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

39 वर्षीय वैभवीचा अपघात झाला त्यावेळी तिचा भावी पतीही तिच्यासोबत होता, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, तिच्या पतीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेले दोन गुणी अभिनेते नितेश पांडे आणि वैभव उपाध्याय यांच्या निधनामुळे टीव्ही-चित्रपट उद्योग जगतात शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)