पॅरिसमध्ये अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Published

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केलाय. मध्य पॅरिसमधील भागात ही घटना घडलीय. कुर्डीश सांस्कृतिक केंद्रापासून जवळच हा प्रकार घडला.

प्रशासनाने रु डी एन्गिन या परिसरात जाणं टाळावं असं आवाहन केलं आहे.

या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

साधारण साठीतल्या वाटणाऱ्या माणसाला पोलिसांनी तातडीने पकडलं आहे.

गोळीबारामुळे इथे भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण आहे. आम्ही स्वत:ला दुकानात बंद केलं आहे असं एका दुकानदाराने सांगितलं.

सात ते आठ बंदुकीच्या फेरी ऐकल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूकही पोलिसांनी जप्त केलीय.

या गोळीबाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या गोळीबाराचा अद्याप उद्देश कळू शकलेला नाही.