You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शंकरबाबा पापळकर : 'पद्मश्री स्वीकारल्यावर पंतप्रधान मोदींनी मला वचन दिलं की...'
एसटी स्टॅंड, रुग्णालय अशा ठिकाणी जर कुणी 'बेवारस' बालक सापडलं तर त्या बालकाचं एक हक्काचं घर आहे, ही जाणीव परतवाड्यातील शेकडो जणांच्या मनात रूजली आहे. या मुलांना शंकरबाबांच्या अनाथाश्रमात नक्की जागा मिळेल याची कल्पना असल्यामुळेच जर समजा कुणी असं अनाथ बालक सापडलं तर ते वझ्झर आश्रमात आणलं जातं.
तिथे शंकरबाबा त्या मुलांची जीव लावून देखभाल करतात, त्यांचं संगोपन करतात. इतकंच नाही तर या मुलांना आपले नाव देखील देतात. याच शंकरबाबांना 09 मेच्या संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाहा या पुरस्कार सोहळ्यानंतर सर्वप्रथम बीबीसी मराठीशी बोलताना पापळकरांनी कोणती मोठी बातमी दिली.
मुलाखत - विशाखा निकम