बीफ प्रकरणाबद्दल अश्रफ अलींनी बीबीसीला काय सांगितलं?
बीफ प्रकरणाबद्दल अश्रफ अलींनी बीबीसीला काय सांगितलं?
Published
(यातली काही दृश्यं विचलित करू शकतात.)
72 वर्षांचे अश्रफ अली सय्यद हुसैन अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. चाळीसगावचे रहिवासी असलेल्या अश्रफ यांना 28 ऑगस्टला कल्याणला आपल्या मुलीकडे जात असताना गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली.
या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी सहा आरोपींविरोधात आता धार्मिक भावना भडकवणे, मालमत्तेचा चोरी आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यामुळे या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या तीन आरोपींना आता पुन्हा अटक केली जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी केवळ मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
रिपोर्ट - दिपाली जगताप
शूट - शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट - निलेश भोसले





