बीफ नेत असल्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण, धुळे-मुंबई ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, बीफ नेत असल्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण, धुळे-मुंबई ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
बीफ नेत असल्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण, धुळे-मुंबई ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
Published

इगतपुरीजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बीफ घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीला सहप्रवाशांनी मारहाण केली.

या कथित घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर जीआरपीने (शासकीय रेल्वे पोलीस) त्याची चौकशी सुरू केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये डझनभर लोक ट्रेनमध्ये एका व्यक्तीवर हल्ला आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.

धुळे-सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये 28 ऑगस्ट 2024 रोजी हा प्रकार घडला असून, या प्रकरणात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.