'व्होट जिहाद' ते 'मंगळसूत्र': पंतप्रधानांची 'ती' भाषणं

'व्होट जिहाद' ते 'मंगळसूत्र': पंतप्रधानांची 'ती' भाषणं
Published

पंतप्रधान नरेंद्र मोदींची या लोकसभा निवडणुकीतली भाषणं चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी ते हिंदू-मुस्लीम, मंगळसूत्र, व्होट जिहाद, अशा अनेक शब्दांचा वापर करताना दिसले, ज्यावरून देशभरात नाराजी व्यक्त झाल्यानंतर भाजपला निवडणूक आयोगाने नोटीसही पाठवली आहे.

यामुळेच की काय, नुकतंच एका टीव्ही मुलाखतीत बोलतानी मोदी म्हणाले, की ‘ज्या दिवशी मी हिंदू-मुसलमान करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य राहणार नाही... मी हिंदू-मुसलमान करणार नाही, हा माझा संकल्प आहे’.

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याला त्यांचा बचाव म्हणावं की काय, पण 14 मेला हे स्पष्टीकरण दिल्यानंतर 15 मे महाराष्ट्रात असताना त्यांनी पुन्हा जय श्री रामच्या घोषणा दिल्या, काँग्रेसचं सरकार धर्माच्या आधारे अर्थसंकल्पाचं विभाजन करू पाहतंय, असं म्हणाले.

पाहा पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीतल्या भाषणांमध्ये कुठे-कुठे, कधी-कधी हिंदू-मुसलमान आणि धार्मिक शब्दांचा वापर करत भाषणं केली.

निवेदन - सिद्धनाथ गानू

निर्मिती - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर