दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, पाच जण ताब्यात

आत्महत्या
Published

दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात ठराविक अंतराने 7 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नदी पात्रात आढळलेल्या या मृतदेहांमागचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून यासंबंधी पाच लोकांना अटक करण्यात आली आहे.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भीमा नदी पात्रात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

नदीच्या परिसरात पोलीस आणि पुणे महानगरपालिकेची रेस्क्यू टीम कडून शोध मोहीम सुरू होती.

भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारीला एका महिलेचा मृतदेह आढळला. 20 जानेवारीला एका पुरुषाचा मृतदेह मिळाला.

पुढच्या दिवशी आणखी एका महिलेचा तर त्याच्या पुढच्या दिवशी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

प्रतिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

24 तारखेला तीन लहान मुलांचे मृतदेह आढळल्याने याप्रकरणाचं गूढ वाढलं. 4 दिवसांच्या अंतरात 7 मृतदेह सापडले.

ज्यांचे मृतदेह आढळले ती सगळी माणसं बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहन पवार हे आपली पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडं यांच्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज इथे राहत होते. मोलमजुरीचं काम करुन हे कुटुंब उदरनिर्वाह करत होतं.

सातपैकी चार मृतदेहांचं शवविच्छेदन झालं असून या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. चारही मृतदेहांवर कोणत्याही स्वरुपाच्या जखमा नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे पण एवढ्या सगळ्या लोकांचा मृत्यू कसा झाला, यामागे अपघात, घातपात नक्की काय कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)