CCTV फुटेज : धार्मिक समारंभातून 1 कोटींचा सोन्याचा कलश चोरीला कसा गेला?

CCTV फुटेज : धार्मिक समारंभातून 1 कोटींचा सोन्याचा कलश चोरीला कसा गेला?
Published

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुरू असलेल्या जैन धार्मिक समारंभातून सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा कलश चोरीला गेला आहे.

पोलिसांनी PTI या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या कलशात 760 ग्रॅम सोने तसेच 150 ग्रॅम हिरे, माणिक आणि पाचू जडवलेले होते.

व्यापारी सुधीर जैन दररोज पूजेसाठी हा कलश आणत असत. 3 सप्टेंबर रोजी स्वागत समारंभादरम्यान झालेल्या गोंधळात तो स्टेजवरून गायब झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताचे हालचाली कैद झाल्या असून, पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे. लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)