शहापूर अपघात: कोसळलेल्या पुलाखालून वाचलेले प्रेमप्रकाश यांनी सांगितला 'तो' प्रसंग

व्हीडिओ कॅप्शन, कोसळलेल्या पुलाखालून वाचलेले प्रेमप्रकाश यांनी सांगितला 'तो' प्रसंग
शहापूर अपघात: कोसळलेल्या पुलाखालून वाचलेले प्रेमप्रकाश यांनी सांगितला 'तो' प्रसंग
शहापूर अपघात
Published

समृद्धी महामार्गावर निर्माणाधीन पूल कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या सरलांभबे गावाजवळ पुलाचं बांधकाम सुरू असताना, एक गर्डर मशीन कोसळल्याने ही घटना घडली आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी हा पूल बांधण्यात येत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं. त्याचसोबत त्यांनी माहिती दिली की, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत दिली जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)