उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ प्रश्न आणि अरविंद सावंत संतापले, पत्रकार परिषदेत काय झालं?

व्हीडिओ कॅप्शन, उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ प्रश्न आणि अरविंद सावंत संतापले, पत्रकार परिषदेत काय झालं?
उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ प्रश्न आणि अरविंद सावंत संतापले, पत्रकार परिषदेत काय झालं?
Published

उद्धव ठाकरे भेटत नाहीत? या नेहमी होणाऱ्या आरोपावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते संतापले.

सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

14 जूनला म्हणजे रविवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला पाच खासदार प्रत्यक्षरित्या उपस्थित न राहता, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तेव्हापासूनच खरंतर 'खासदार फुटी'च्या चर्चांना सुरुवात झाली.

यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष हजर नव्हते.

तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे बैठकीला उपस्थित होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)