फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग 'गुप्त बंकर' उभारून कसली तयारी करतायेत?

मार्क झुकरबर्ग
    • Author, झोई क्लेनमन
    • Role, टेक्नॉलॉजी एडिटर
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी हवाईच्या काऊआई या बेटावरील 1400 एकर अशा विस्तीर्ण जागेवर 2014 पासून 'कूलाऊ रँच'वर काम सुरू केल्याचं सांगितलं जातं.

वायर्ड मासिकाच्या एका वृत्तानुसार, या जागेत एक आश्रयस्थान उभारलं जात आहे, ज्यात स्वतःची वीज आणि अन्नसाठा असेल. परंतु, या जागेवर काम करणाऱ्या सुतार आणि इलेक्ट्रिशियनना गोपनीयतेचे करार असल्यामुळे याबद्दल बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.

सहा फूट उंच भिंत असल्यामुळे रस्त्यावरून हा प्रकल्प दिसत नाही.

तुम्ही डूम्सडे बंकर तयार करत आहात का? असा प्रश्न मागील वर्षी झुकरबर्ग यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी 'नाही' असं म्हटलं. ते म्हणाले की, ही सुमारे 5,000 चौरस फूट भूमिगत जागा आहे आणि 'हे फक्त एक लहान आश्रयस्थान आहे, तळघरासारखं (बेसमेंट)'.

पण यामुळे चर्चा थांबल्या नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी कॅलिफोर्नियातील पालो अल्टोच्या क्रेसेंट पार्क भागात 11 मालमत्ता खरेदी केल्याचीही चर्चा आहे. ज्याच्या खाली अंदाजे 7,000 चौरस फूट भूमिगत जागा तयार केली जात आहे.

झुकरबर्ग यांनी पालो अल्टोच्या एका भागात मालमत्तांवर 110 मिलियन डॉलर खर्च केले असल्याचं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images

फोटो कॅप्शन, झुकरबर्ग यांनी पालो अल्टोच्या एका भागात मालमत्तांवर 110 मिलियन डॉलर खर्च केले असल्याचं सांगितलं जातं.

न्यूयॉर्क टाइम्सनुसार, जरी त्यांच्या इमारतीच्या परवानगीमध्ये बेसमेंटचा उल्लेख असला तरी, काही शेजारी त्याला बंकर किंवा अब्जाधीशांची 'बॅट केव्ह' म्हणतात.

ज्यांनी जमिनीचे तुकडे खरेदी केले आहेत आणि त्याखाली भूमिगत जागा तयार केली आहे, अशा इतर टेक लीडर्सबद्दलही चर्चा सुरू आहे. या भूमिगत जागेचं महागड्या बंकरमध्ये रूपांतर करता येऊ शकतं.

लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन हे 'अपोकॅलिप्स इन्शुरन्स'बद्दल बोलले आहेत. ते म्हणतात की, सुमारे अर्ध्या अतिश्रीमंतांपैकी अर्ध्या लोकांकडे हे असतं, आणि न्यूझीलंड घरांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

तर, ते खरंच युद्धासाठी, हवामान बदलासाठी, किंवा काही अशा महाप्रलयंकारी घटनेसाठी तयारी करत आहेत का, ज्याची आपल्याला अजून माहितीच नाही?

जागतिक आपत्तीच्या वेळेस मी पीटर थीएलसोबत न्यूझीलंडमधील एका दुर्गम जागेवर जाऊ शकतो, असं सॅम ऑल्टमन यांनी एकदा असा अंदाज व्यक्त केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जागतिक आपत्तीच्या वेळेस मी पीटर थीएलसोबत न्यूझीलंडमधील एका दुर्गम जागेवर जाऊ शकतो, असं सॅम ऑल्टमन यांनी एकदा असा अंदाज व्यक्त केला होता.

गेल्या काही वर्षांत, कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) वेगवान प्रगती ही संभाव्य संकटांच्या यादीत आणखी एक चिंता वाढवणारी गोष्ट बनली आहे. अनेक लोक प्रगतीच्या या वेगाबद्दल खूप चिंतित आहेत.

ओपन एआयचे मुख्य शास्त्रज्ञ आणि सह-संस्थापक इल्या सुत्सकेव्हर हे त्यापैकी एक आहेत.

2023 च्या मध्यापर्यंत, सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनीने चॅट जीपीटी लाँच केलं. हा चॅटबॉट आता जगभरातील कोट्यवधी लोक वापरत आहेत आणि ते त्यावर जलद अपडेट्सही करत आहेत.

पण त्या उन्हाळ्यात, पत्रकार कॅरेन हाओ यांच्यानुसार, सुत्सकेव्हर यांना हळूहळू खात्री झाली की, संगणक शास्त्रज्ञ कृत्रिम सामान्य बुद्धिमत्तेची (एजीआय) निर्मिती करायला जवळ येत आहेत, अशी बुद्धिमत्ता जिथे मशीन मनुष्याच्या बुद्धीशी ती जुळते.

हाओ यांच्या अहवालानुसार, एका बैठकीमध्ये सुत्सकेव्हर यांनी सहकाऱ्यांना सुचवलं की, कंपनीच्या मुख्य शास्त्रज्ञांसाठी असं शक्तिशाली तंत्रज्ञान जगासमोर येण्यापूर्वी त्यांनी भूमिगत आश्रय (अंडरग्राऊंड शेल्टर) तयार करावा.

'एजीआय रिलीज होण्यापूर्वी आम्ही नक्कीच एक बंकर तयार करणार आहोत,' असं इल्या सुत्सकेव्हर यांनी सांगितल्याचं अहवालात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, 'एजीआय रिलीज होण्यापूर्वी आम्ही नक्कीच एक बंकर तयार करणार आहोत,' असं इल्या सुत्सकेव्हर यांनी सांगितल्याचं अहवालात म्हटलं आहे.

अहवालानुसार, त्यांनी असं म्हटले आहे की, 'एजीआय रिलीज होण्यापूर्वी आम्ही नक्कीच बंकर तयार करू.' पण 'आम्ही' म्हणून त्यात कोणाकोणाचा समावेश केला हे स्पष्ट झालेलं नाही.

यामुळे एक विचित्र गोष्ट उघड होते: अनेक आघाडीचे संगणक शास्त्रज्ञ आणि टेक लीडर्स, खूप बुद्धिमान एआय विकसित करण्यासाठी मेहनत करत आहेत. त्यांना भविष्यात हे एआय काय करू शकतं याची भीतीही खूप वाटते.

तर एजीआय नेमकं केव्हा- कधी येईल? आणि ते खरंच इतकं बदल घडवून आणेल की सामान्य लोक घाबरतील?

'आपल्या कल्पनेपेक्षा आधी येईल'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

टेक लीडर्स म्हणतात की, एजीआय लवकरच येणार आहे. ओपन एआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांनी डिसेंबर 2024 मध्ये सांगितलं की, ते 'जगातील बहुतेक लोकांच्या कल्पनेपेक्षा लवकर येईल'.

डीपमाइंडचे सह-संस्थापक सर डेमिस हसाबिस म्हणतात की, पुढील 5 ते 10 वर्षांत हे होऊ शकतं. तर अँथ्रोपिकचे संस्थापक डारिओ अमोदेई यांनी मागील वर्षी लिहिलं की, त्यांचा आवडता शब्द 'शक्तिशाली एआय' (पॉवरफुल एआय) कदाचित 2026 पर्यंत आपल्यासोबत असू शकतो.

काही जण शंका घेतात. साउथॅम्प्टन युनिव्हर्सिटीच्या संगणक शास्त्राच्या प्राध्यापिका डेम वेंडी हॉल म्हणतात, 'ते सतत नियम बदलतात. तुम्ही कोणाशी बोलता त्यावर अवलंबून आहे.' आम्ही फोनवर बोलत होतो, पण त्यांचे डोळे फिरवण्याचे भाव जवळजवळ ऐकू येत होते.

त्या पुढे म्हणतात, 'वैज्ञानिक समुदाय म्हणतो की एआय तंत्रज्ञान आश्चर्यकारक आहे. पण ते अजूनही मानवी बुद्धिमत्तेच्या जवळपास नाही'.

यापूर्वी काही 'मूलभूत शोध' लागतील, असं टेक कंपनी कॉग्निझंटचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बाबक होजत हे मान्य करतात.

तसेच, तो एकच क्षण येण्याची शक्यता नाही. एआय हे जलद प्रगती करणारं तंत्रज्ञान आहे, तो एक प्रवास आहे आणि जगभरातील अनेक कंपन्या स्वतःचं एआय व्हर्जन तयार करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

'सिंग्युलॅरिटी' या कल्पनेचा उल्लेख सर्वात आधी करण्याचे श्रेय जॉन वॉन न्यूमन यांना दिले जाते. तेव्हा या संकल्पनेला नावही नव्हतं. ते भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'सिंग्युलॅरिटी' या कल्पनेचा उल्लेख सर्वात आधी करण्याचे श्रेय जॉन वॉन न्यूमन यांना दिले जाते. तेव्हा या संकल्पनेला नावही नव्हतं. ते भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ होते.

परंतु, सिलिकॉन व्हॅलीमधील काही लोकांमध्ये ही कल्पना उत्साह वाढवते. कारण हे तंत्रज्ञान मानवी बुद्धीपेक्षा अधिक प्रगत होईल, असं मानलं जातं... म्हणजेच एएसआय किंवा कृत्रिम सुपरइंटेलिजन्स.

'सिंग्युलॅरिटी' (एकवचन) या संकल्पनेचे श्रेय 1958 मध्ये हंगेरीत जन्मलेले गणितज्ज्ञ जॉन वॉन न्यूमन यांना मरणोत्तर दिले गेले. यात असा क्षण सांगितला आहे, जेव्हा संगणकाची बुद्धिमत्ता मानवी समजाच्या पलीकडे जाते.

अलीकडे, 2024 मध्ये एरिक श्मिट, क्रेग मुंडी आणि दिवंगत हेन्री किसिंजर यांनी लिहिलेल्या 'जेनेसिस' या पुस्तकात एक कल्पना मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, एक अतिशय शक्तिशाली तंत्रज्ञान निर्णय घेणं आणि नेतृत्व करण्यात इतकं सक्षम होईल की शेवटी आपण त्याच्याकडे पूर्ण नियंत्रण सोपवू.

ते म्हणतात, हे होणारच आहे... फक्त कधी होईल, एवढाच प्रश्न आहे.

अत्याधुनिक बंकर

नोकरीशिवाय सगळ्यांना पैसे?

एजीआय आणि एएसआयचे समर्थक त्याच्या फायद्यांबद्दल खूप उत्साही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, हे तंत्रज्ञान प्राणघातक आजारांवर नवे उपचार शोधेल, हवामान बदलाची समस्या सोडवेल आणि अमर्याद स्वच्छ ऊर्जेचा स्रोत निर्माण करेल.

इलॉन मस्क यांनी तर असंही म्हटलं आहे की, सुपर-इंटेलिजेंट एआयमुळे 'सर्वांसाठी जास्त (उच्च) उत्पन्न' असलेला काळ येऊ शकतो.

त्यांनी अलीकडे अशी कल्पना मांडली की, एआय इतकं स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध होईल की प्रत्येकालाच 'आपला स्वतःचा आर2-डी2 आणि सी-3पीओ' (स्टार वॉर्समधील ड्रॉइड्सचा संदर्भ देत) हवा वाटेल.

"प्रत्येकाकडे उत्तम आरोग्यसेवा, अन्न, घर, प्रवासाची सोय आणि बाकी सगळं काही असेल. हा शाश्वत समृद्धीचा काळ असेल," असं ते उत्साहानं म्हणाले.

नक्कीच, याची भीतीदायक बाजूही आहे. हे तंत्रज्ञान दहशतवाद्यांकडे गेल्यास शस्त्र म्हणून ते वापरलं जाऊ शकतं, किंवा जर एआयने स्वतः निर्णय घेत ठरवलं की मानवता हीच जगाच्या समस्यांचं कारण आहे आणि आपल्याला नष्ट केलं गेलं, तर काय होईल?

इलॉन मस्क यांनी मान्य केलं की, प्रत्येकाला आपला स्वतःचा आर2-डी2 आणि सी-3पीओ हवा असेल.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, इलॉन मस्क यांनी मान्य केलं की, प्रत्येकाला आपला स्वतःचा आर2-डी2 आणि सी-3पीओ हवा असेल.

"जर ते तुमच्यापेक्षा बुद्धिमान असेल, तर आपल्याला ते नियंत्रित ठेवावे लागेल," असा इशारा वर्ल्ड वाइड वेबचे निर्माता टिम बर्नर्स-ली यांनी या महिन्यात बीबीसीशी बोलताना दिला.

"आपल्याला ते बंद करण्याची क्षमता असावी."

सरकार काही संरक्षणात्मक पावलं उचलत आहे. अमेरिकेमध्ये, जिथे अनेक आघाडीच्या एआय कंपन्या आहेत, तेथे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी 2023 मध्ये एक आदेश जारी केला. ज्यामुळे काही कंपन्यांना त्यांच्या सुरक्षा चाचणीचे निकाल फेडरल सरकारला द्यावे लागले.

परंतु, नंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यातील काही आदेश रद्द केले, आणि ते 'नवोन्मेषासाठी (नावीन्यता) अडथळा' असल्याचं म्हटलं.

याच दरम्यान, यूकेमध्ये, एआय सेफ्टी इन्स्टिट्यूट- ही सरकारच्या निधीवर चालणारी संशोधन संस्था दोन वर्षांपूर्वी स्थापन केली गेली. जिचा उद्देश हा प्रगत एआयमुळे उद्भवणारे धोके समजून घेणं आहे.

आणि मग सुपर रिच (अति श्रीमंत) लोकांकडे स्वतःच्या 'जागतिक आपत्कालीन विमा' (महाप्रलयासाठीच्या) योजना आहेत.

प्रत्येकाकडे उत्तम आरोग्यसेवा, अन्न, घर, प्रवासाची सोय आणि बाकी सगळं काही असेल. हा शाश्वत समृद्धीचा काळ असेल," असं अब्जाधीश इलॉन मस्क उत्साहानं म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रत्येकाकडे उत्तम आरोग्यसेवा, अन्न, घर, प्रवासाची सोय आणि बाकी सगळं काही असेल. हा शाश्वत समृद्धीचा काळ असेल," असं अब्जाधीश इलॉन मस्क उत्साहानं म्हणाले.

रीड हॉफमन यांनी म्हटलं की, 'न्यूझीलंडमध्ये घर खरेदी करतोय' असं सांगणं म्हणजे एक संकेत आहे, जास्त काही सांगण्याची गरज नाही.' हेच बहुधा बंकरसाठीही लागू होतं.

पण यात एक मानवी दोषही आहे.

मी एकदा एका अब्जाधीशाच्या माजी बॉडीगार्डला भेटलो, ज्याच्याकडे स्वतःचा 'बंकर' आहे. त्यानं सांगितलं की, जर खरंच काही झालं, तर त्याच्या सुरक्षा टीमचं पहिलं प्राधान्यक्रम असेल की बॉसला बाहेर काढून स्वतः बंकरमध्ये जाणं. आणि हे सांगताना तो मस्करी करतोय असं वाटत नव्हतं.

हे खरंच भीती वाढवण्यासारखं आहे का?

नील लॉरेन्स हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये मशीन लर्निंगचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते, हा सगळा वादविवाद किंवा संपूर्ण चर्चाच स्वतः मूर्खपणाची आहे.

त्यांच्या मते, "कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता' (एजीआय) ही कल्पना तितकीच हास्यास्पद आहे जितकी 'कृत्रिम सामान्य वाहन' (आर्टिफिशियल जनरल व्हेइकल) ही कल्पना."

"योग्य वाहन परिस्थितीवर अवलंबून असते. केनियाला जायला मी एअरबस ए350 वापरतो, रोज विद्यापीठाला जायला कार वापरतो, कॅफेटेरियाला चालत जातो… असं सर्व एकच वाहन कधीही करू शकत नाही."

त्यांच्या मते, एजीआय बद्दल बोलणं फक्त लक्ष विचलित करण्यासारखं आहे.

"आपण तयार केलेलं तंत्रज्ञान यामुळे, पहिल्यांदाच, सामान्य लोक थेट मशीनशी बोलू शकतात आणि त्याला आपली इच्छा पूर्ण करण्यास सांगू शकतात. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे… आणि पूर्णपणे बदल घडवणारं आहे."

"सर्वात मोठी चिंता म्हणजे आपण एजीआयबद्दल मोठ्या टेक कंपन्यांच्या गोष्टींमध्ये इतके गुंततो की, लोकांसाठी गोष्टी अधिक चांगल्या बनवण्याच्या आवश्यकतेकडे लक्षच देत नाही."

मार्क झुकरबर्ग पत्नी प्रिसिला सोबत. हवाईतील आपल्या कंपाऊंडमधील भूमिगत जागा 'फक्त एका छोट्याशा आश्रयस्थळा'सारखं आहे, असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मार्क झुकरबर्ग पत्नी प्रिसिला सोबत. हवाईतील आपल्या कंपाऊंडमधील भूमिगत जागा 'फक्त एका छोट्याशा आश्रयस्थळा'सारखं आहे, असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

सध्याची एआय साधनं प्रचंड डेटा वापरून प्रशिक्षित केली जातात आणि पॅटर्न ओळखण्यात चांगली आहेत. जसं स्कॅनमध्ये ट्यूमरची चिन्हं किंवा एका शब्दानंतर कोणता शब्द येण्याची शक्यता आहे हे ओळखणं. पण ते 'भावना' अनुभवत नाहीत, जरी त्यांच्या उत्तरांमुळे असं वाटत असलं तरी.

"एआयच्या चॅटबॉट्सच्या आधारभूत तंत्रज्ञानावर तयार केलेले लार्ज लँग्वेज मॉडेल 'मेमरी' किंवा शिकत असल्यासारखं वागवण्यासाठी काही 'फसवणुकीचे' मार्ग आहेत, पण हे समाधानकारक नाहीत आणि माणसांपेक्षा खूपच कमी आहेत," असं होजत म्हणतात.

2001: अ स्पेस ओडिसी सारख्या चित्रपटांनी संवेदनशील असलेल्या संगणकांच्या धोक्यांबद्दल सावध केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2001: अ स्पेस ओडिसी सारख्या चित्रपटांनी संवेदनशील असलेल्या संगणकांच्या धोक्यांबद्दल सावध केलं आहे.

कॅलिफोर्नियातील आयव्ही.एआयचे सीईओ विन्स लिंच देखील एजीआयबद्दल अतिशय मोठ्या किंवा अतिउत्साही घोषणांपासून सावध आहेत.

"हे उत्तम मार्केटिंग आहे," ते म्हणतात, "जर तुम्ही अशा कंपनीचे भाग आहात जी आतापर्यंत अस्तित्वात असलेली सर्वात हुशार गोष्ट तयार करत आहे, तर लोक तुम्हाला पैसे द्यायला उत्सुक होतील."

ते पुढे म्हणतात, "हे दोन वर्षांत होणारं काम नाही. यासाठी खूप संगणकीय शक्ती, मानवी सर्जनशीलता, अनेक प्रयोग आणि चुकांची गरज आहे."

एजीआय कधी तयार होईल? असं त्यांना विचारलं. त्यावेळी त्यांनी एक मोठा पॉज (शांत बसले) घेतला.

"मला खरंच माहिती नाही."

"जाणीवेशिवाय बुद्धिमत्ता"

काही बाबतीत, एआय आधीच मानवी मेंदूंपेक्षा पुढे आहे. एक जनरेटिव्ह एआय साधन एका क्षणाला मध्ययुगीन इतिहासाचा तज्ज्ञ असू शकतो आणि दुसऱ्या क्षणाला कठीण गणितीय समीकरणही सोडवू शकतं.

काही टेक कंपन्या म्हणतात की, त्यांची उत्पादनं त्यांच्याप्रमाणेच उत्तरं का देतात, हे त्यांना नेहमी माहिती नसतं. मेटा म्हणतं की, त्यांच्या एआय प्रणाली स्वतःला सुधारत असल्याची काही चिन्हे दिसत आहेत.

शेवटी, मशीन कितीही बुद्धिमान झाले तरी, जैविक दृष्ट्या मानवी मेंदू अजूनही जिंकतो. त्यात सुमारे 86 अब्ज न्यूरॉन्स आणि 600 ट्रिलियन सायनॅप्स आहेत, जे कृत्रिम इक्विलंट्सपेक्षा (समतुल्य) खूप जास्त आहेत.

संशोधक मेंदूचा अभ्यास करत आहेत, जेणेकरून जाणीव किंवा चेतना कशी कार्य करते हे चांगलं समजू शकेल.
फोटो कॅप्शन, संशोधक मेंदूचा अभ्यास करत आहेत, जेणेकरून जाणीव किंवा चेतना कशी कार्य करते हे चांगलं समजू शकेल.

मेंदूला परस्परसंवादांमध्ये थांबण्याची गरज नाही, आणि ते सतत नवीन माहितीसोबत जुळवून घेत राहतं.

"जर तुम्ही माणसाला सांगितलं की, एखाद्या ग्रहावर जीवन आहे, तो लगेच शिकतो आणि त्याच्या विचारांवर याचा परिणाम होतो. पण एका एआयसाठी, तो फक्त तितकाच वेळ माहीत राहतो जोपर्यंत, तुम्ही त्याला सतत तेच सांगत राहता," असं होजत म्हणतात.

"एलएलएममध्ये मेटा-कॉग्निशन नसतं, म्हणजे त्यांना ते काय माहीत आहे ते नीट कळत नाही. माणसांकडे आत्मनिरीक्षणाची क्षमता असते, ज्याला कधी कधी जाणीव म्हणतात, ज्यामुळे त्यांना काय माहीत आहे हे त्यांना समजू शकतं."

हा मानवी बुद्धिमत्तेचा एक मूलभूत भाग आहे आणि अद्याप तो प्रयोगशाळेत बनवलेला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)