बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

चीन त्यांच्या देशातला सर्वात मोठा खड्डा खणतोय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीन त्यांच्या देशातला सर्वात मोठा खड्डा खणतोय
Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. चीन पृथ्वीच्या पोटात 11 हजार मीटर खोल खड्डा खणतोय, कारण...

चीन आपल्या वायव्य दिशेला असणाऱ्या सिंकयांग प्रदेशातल्या टकलामकान वाळवंटात 11 किलोमीटरहून जास्त खोल खड्डा खणतोय.

गेल्या आठवड्यात या योजनेची सुरुवात झाली.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या एका रिपोर्टनुसार हा खड्डा पृथ्वीवरचा सर्वात प्राचीन काळ, क्रेटासियस काळातल्या आवरणांपर्यंत पोचेल.

क्रेटासियस एक भूगर्भीय काळ मानला जातो जो 14.5 ते 6.6 कोटी वर्षं जुना समजला जातो.

या योजनेला 457 दिवस लागण्याचा अंदाज आहे.

2. रोजच्या आहारातल्या 'या' 7 गोष्टी खाताना काळजी घेतली नाही तर होऊ शकते विषबाधा

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमधल्या एका खाजगी महाविद्यालयातील 26 विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखी, चक्कर असा त्रास सुरू झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

या विद्यार्थिनींनी आजारी पडण्याच्या आदल्या रात्री हॉस्टेलच्या मेसमध्येच जेवण केलं होतं. त्यांना अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचं निदान करण्यात आलं.

आहार

फोटो स्रोत, Getty Images

या घटनेच्या आधीही आंध्र प्रदेशमधल्याच श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या एका विद्यालयातील 29 विद्यार्थिनींना फूड पॉयझनिंगचा त्रास झाला होता.

जेवणातून विषबाधा झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकत असतो. विषबाधा होऊ नये, यासाठी काय करायला हवं?

3. सुलोचना लाटकर : 'त्या' तक्रारीनंतर सिनेमांमध्ये डान्स करणं कायमचं सोडलं...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांचं निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलोचना यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सुलोचना यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील, असं मोदींनी म्हटलं आहे.

सुलोचना लाटकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुलोचना लाटकर

पंतप्रधानांनी ट्विट करत लिहिलंय की, “सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं आहे. त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना, ओम शांती.”

चित्रपटातली आई म्हणून सुलोचना ओळखल्या जात असत. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या.

4. मुंबईपासून बिपरजॉय चक्रीवादळ किती अंतरावर?

मात्र, हे वादळ कोणत्या किनारपट्टीवर धडकेल, याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. हे वादळ कुठे धडकणार याबाबत हवामान खात्यानं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

वादळ

फोटो स्रोत, Getty Images

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय मुंबईपासून 820 किमी, पोरबंदरपासून 830 किमी आणि कराचीपासून1120 किमी अंतरावर आहे. पुढील 36 तासांत हे वादळ आणखी तीव्र होईल.”

अरबी समुद्रात आलेले हे या वर्षातील पहिलं वादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात मोखा नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि नंतर त्याचंही तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं होतं.

5. अ‍ॅपलच्या नव्या व्हिजन प्रो हेडसेट आणि IOS-17 मध्ये ही आहेत खास वैशिष्ट्यं...

अ‍ॅपलने आपला बहुप्रतीक्षित ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटी हेडसेट व्हिजन प्रो लॉन्च केला आहे.

गेल्या दहा वर्षांत अ‍ॅपलने लॉन्च केलेलं हे पहिलं हार्डवेअर आहे.

अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितलं की, हा नवीन हेडसेट आभासी (व्हर्चुअल) आणि वास्तव जगाची सरमिसळ अतिशय सहजेतनं घालतो.

अॅपल

फोटो स्रोत, apple

तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अ‍ॅपलने आयफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आणि मॅकबुक एअर लॅपटॉपसाठीही नवीन अपडेट सादर केला आहे.

हा हेडसेट एकदा चार्ज झाल्यानंतर दोन तासांपर्यंत चालू शकतो. याची किंमत 3499 डॉलर म्हणजे जवळपास दोन लाख 80 हजार एवढी आहे. हा हेडसेट पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला अमेरिकेतील बाजारपेठेतच उतरवला जाईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)