You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी ऑटिस्टिक आहे आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते'
क्रिस्टिन मॅकगिनिझ या ब्रिटिश टीव्ही स्टार आणि मॉडेल आहेत. 2021 मध्ये 33 व्या वर्षी त्यांना ऑटिझमचं निदान झालं.
त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्या जेव्हा लहान होत्या, तेव्हा एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यास त्यांना त्रास होत असे.
“मी अतिशय गोंधळलेली मुलगी होते. मी नक्की कुठे जातेय आणि कुठे फिट होतेय मलाच अजिबात कळत नाही,” असं त्यांनी बीबीसी पत्रकार हार्वी डे यांच्याशी बोलताना सांगितलं.
लहान असताना वासांशी निगडित समस्यामुळे त्या Beige food खात असत.त्यामुळे त्यांना खाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आणि त्यांची पाळी बंद झाली.
मॅकगिनिझ यांना आवाजाचा आणि वासाचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे त्यांना गर्दी अजिबात सहन होत नाही.
“मला कायम इअरप्लग घालायचे असतात,” असं त्या सांगतात. अगदी घड्याळाच्या काट्यांचा आवाजही त्यांना सहन होत नाही.
कठीण प्रसंग
त्या लहान असताना आणखी एक प्रसंग त्यांच्यावर ओढवला होता. मॅकगिनिझ सांगतात की, त्यांच्यावर 9 ते 11 या वयात अत्याचार करण्यात आले होते. तसंच 14 वर्षांच्या असताना त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला.
हा अनुभव त्यांच्यासाठी इतका वेदनादायी होता की रोज रात्री त्या प्रार्थना करायच्या की उद्याची सकाळ होऊच नये. तो अतिशय भीषण अनुभव होता असं त्या सांगतात.
मॅकगिनिझ यांच्याबरोबरच फक्त असं होत नाही. नॅशनल ऑटिस्टिक सोसायटीच्या क्लिनिकल डायरेक्टर सारा लिस्टर ब्रुक सांगतात की, अनेक ऑटिस्टिक बायका आणि मुलींवर लैंगिक अत्याचार होतात.
हा छळ पुढे बरंच गंभीर स्वरुप घेऊ शकतो. “हा अतिशय गंभीर आणि अतिशय काळजीचा विषय आहे,” ब्रुक सांगतात.
2022 मध्ये युके मध्ये झालेल्या एका संशोधन करण्यात आलं. 225 लोकांवर हे संशोधन करण्यात आलं. त्यापैकी 10 पैकी 9 बायकांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. जेव्हा पहिल्यांदा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले तेव्हा त्या अतिशय लहान होत्या.
“हे थकवणारं आहे.”
ऑटिझम हा रोग नसून ती एक स्थिती आहे. त्यात माणसाचा मेंदू इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो.
ऑटिझम हा प्रत्येक रुग्णात वेगवेगळ्या स्वरुपात आढळतो.
काही व्यक्तींच्या संवाद साधण्याच्या क्षमतेत फरक असतो, काही लोकांना सतत चिंता वाटते, काही लोक एकच गोष्ट वारंवार करतात.
स्त्रियांच्या ऑटिझमवर फारसं लक्ष दिलं जात नाही. कारण ऐतिहासिकदृष्ट्या हा पुरुषांमध्ये किंवा मुलांमध्ये आढळणारा आजार आहे किंवा मुली या रोगाची त्यांची लक्षणं लपवण्यात यशस्वी होतात.
मॅकगिनिझ यांनी सुद्धा त्यांनी त्यांची अडचण लववली. उदा. एखादा संवाद साधण्याआधी त्याचा सराव करणं किंवा एखाद्या गटात चर्चा करायची असेल, तेव्हा इतर लोकांसारखं बोलणं असे प्रकार त्या करायच्या.
“हे सगळं खूप थकवणारं असतं,” असं त्या म्हणतात.
ऑटिझम झालेल्या मुली मुख्य प्रवाहातून दूर असतात. त्यामुळे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे इतर नातेसंबंधातही अडचणी निर्माण होतात असं त्यांचं मत आहे.
ऑटिझम असलेल्या लोकांना ऑटिझम नसलेल्या लोकांशी संवाद साधणं अतिशय कठीण असतं. त्यांना सतत इतरांना खुश ठेवायचं असतं. तसंच, शिक्षण, सेक्स याबाबतीत त्यांची ओढाताण होते, असं तज्ज्ञ पुढे सांगतात.
"हे अगदी नॉर्मल आहे"
मॅकगिनिझ यांच्यासारखंच सारा डॉगलस यांनाही प्रौढ वयात ऑटिझमचं निदान झालं. टीनएजर असताना त्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्यामुळे पॅनिक अटॅक आल्याचं त्या म्हणाल्या. खाण्याच्या समस्या निर्माण झाल्या.
डॉगलस या एका पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ऑटिझम झालेले लोक इतरांना आनंदी ठेवण्यात समोर असतात. तसंच आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे लपवण्याचा सातत्याने प्रयत्न करतत.
लैंगिक शिक्षण न मिळाल्याने अत्याचारी लोकांना ओळखता आलं नाही, असं ते सांगतात.
“माझी कहाणी वेगळी नाही. हेच सगळ्यात जास्त कठीण आहे,” असं सारा म्हणाल्या. ऑटिस्टिक लोकांसाठी हे नॉर्मल आहे असं ते पुढे सांगतात.
सकारात्मक बदल
मॅकगिनिझ यांचं मागच्या वर्षी लग्न झालं. ऑटिझमचं निदान झाल्यापासून आयुष्य फारच सुकर झाल्याचं त्यांचं मत आहे.
“मी याआधी फारशी सुखी नसायचे, कारण मी एका कोशात होते आणि मला कोणताही बदल आवडायचा नाही,” ती सांगते.
निदान झाल्यापासून तिच्यात अनेक सकारात्मक बदल झाल्याचं ती सांगते.
“या रोगामुळे मला स्वत:ला समजून घेण्यात खूप मदत झाली. मी स्वत:बरोबर आता जास्त कठोर होत नाही.”
या रोगामुळे तिच्या तीन मुलांना समजून घेण्यासही मदत झाली. तिची मुलं ऑटिझमच्या उंबरठ्यावर आहेत. तेही जास्त इतरांशी बोलत नाहीत.
सारा डॉगलास म्हणतात की निदान झाल्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल आणण्यास मदत झाली.
“मी अजूनही तीच आहे. मला आता अतिशय छान वाटतं.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)