NDA विरुद्ध INDIA : नरेंद्र मोदींविरुद्ध विरोधकांचा चेहरा कोण? | सोपी गोष्ट 901

NDA विरुद्ध INDIA : नरेंद्र मोदींविरुद्ध विरोधकांचा चेहरा कोण? | सोपी गोष्ट 901
Published

भाजपप्रणित National Democratic Alliance म्हणजेच NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार.

दुसरीकडे मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय.

23 जूनला बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि PDPसह अनेक विरोधी पक्षांचे नेते पाटण्यात एकत्र आले होते. आणि आता दुसरी बैठक बंगळुरूत पार पडली.

पण विरोधकांची ही आघाडी मोदींना आव्हान देऊ शकेलका, याविषयी अनेकांच्या मनात शंका आहे. पाहू यात अशा 4 गोष्टी ज्या या आघाडीत बिघाडी ठरू शकतात...

वार्तांकन – प्रियंका, बीबीसी हिंदी

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)