आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांच्या बहिणीला गाडीसह उचलून नेलं तेव्हा...

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांच्या बहिणीला गाडीसह उचलून नेलं तेव्हा...
Published

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांच्या बहीण वायएस शर्मिला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचणार होत्या. आंदोलनस्थळी जाणाऱ्या शर्मिला यांना पोलिसांनी अडवलं. मात्र, गाडीतून बाहेर येण्यास नकार दिल्यानंतर तेलंगाणा पोलिसांनी शर्मिला यांच्यासह त्यांची गाडी टोईंग वॅनने उचलून नेली. यावेळी शर्मिला गाडीतच बसून राहिल्या होत्या.