रिसॉर्टवर नेऊन ठेवलेले काँग्रेस आमदार जेव्हा धोतरांवरच स्विमिंग पूलमध्ये उतरले...

रिसॉर्टवर नेऊन ठेवलेले काँग्रेस आमदार जेव्हा धोतरांवरच स्विमिंग पूलमध्ये उतरले...
Published

2002 मध्ये महाराष्ट्राच्या आमदारांची देशभरात चर्चा झाली होती. स्विमिंग पूलशेजारी छत्र्यांवर धोतरं वाळत घालून उघड्याने उन खात बसलेली महाराष्ट्राची आमदार मंडळी देशभरात टीव्हीवर झळकली होती. हे काय प्रकरण होतं?

2002 साली महाराष्ट्रात विलासराव देशमुखांचं आघाडी सरकार सत्तेत होतं, पण बहुमत काठावरचं होतं. अशातच रायगडमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांवरून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात वाद झाला. शेकापने ज्या अटींवर सरकारला पाठिंबा दिला होता त्या मोडल्याचा आरोप पाटलांनी तटकरेंवर केला.

शेवटी मार्च 2002 मध्ये तटकरेंनी मंत्रिपद सोडलं. पण तीनच महिन्यात त्यांना मंत्रिमंडळात परत घेतलं गेलं. शेकापने यावरून संतापून सरकारचा पाठिंबा काढून घेतला, पाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्षांनीही विलासरावांची साथ सोडली.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)