जबरदस्ती दारू पाजून 11 मजुरांना अमानुष छळ, धाराशीवमध्ये धक्कादायक प्रकार

जबरदस्ती दारू पाजून 11 मजुरांना अमानुष छळ, धाराशीवमध्ये धक्कादायक प्रकार
Published

धाराशिवमध्ये 11 मजूरांना जबरदस्ती दारू पाजून बळजबरीने काम करण्यासाठी साखळीने डांबून ठेवलं.

या मजुरांची सुटका पोलिसांनी 18 जूनला केली. या मजूरांची 2 ते 5 हजार रुपयांना विक्री करण्यात आली होती.

हे सर्वजण अहमदनगरच्या कामगार अड्ड्यावर कामाच्या शोधात गेले होते. विहिर खणण्यासाठी या मजुरांना अक्षरशः गुलाम बनवलं गेलं. त्यांचा अनेक दिवस अमानुष छळ केला गेला.

रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे

व्हीडिओ एडिट- शरद बढे

निर्मिती- प्राजक्ता धुळप

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)