बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. जागतिक बँकेच्या प्रमुखपदासाठी शिफारस झालेले अजय बंगा कोण आहेत?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केलीय. अजय बंगा हे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ आहेत.

जागतिक बँकेनं हवामान बदलाबाबत (Climate Change) ठोस पावलं उचलावी, यासाठीचा पाठपुरावा अमेरिका सातत्यानं करताना दिसतेय. अशावेळी अजय बंगा यांचं नाव अमेरिकेनं सूचवलंय.

अजय बंगा यांनी दशकभराहून अधिक काळ मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व केलं. ते सध्या एका खासगी इक्विटीमध्ये काम करत आहेत.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय बंगा यांना खासगी क्षेत्रासोबत बँकेनं आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसं काम करावं, याचा अनुभव आहे.

बंगा यांची निवड प्रमुखपदी करायची की नाही, हे आता जागतिक बँकेच्या संचालक मंडाळावर अवलंबून आहे.

2. MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच, विद्यार्थ्यांची मागणी मान्य

MPSC च्या मुख्य परीक्षांमध्ये नवा पॅटर्न 2025 पासूनच लागू होईल, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.

MPSC ने आज (23 फेब्रुवारी) ट्विट करून या निर्णयाबाबत सर्वांना माहिती दिली.

नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा, यासंदर्भात अनेक विद्यार्थी संघटनांकडून मागणी करण्यात येत होती. या मागणीला नंतरच्या काळात आंदोलनाचं स्वरुपही प्राप्त झालं होतं. अखेर, या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं आहे.

पण, काही विद्यार्थी संघटना अशाही होत्या ज्यांनी नव्या पॅटर्नला पाठिंबा दर्शवला होता. आता त्या विद्यार्थी संघटना आयोगाच्या निर्णयावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3. गटारांमधून 'सोनं' वाहणाऱ्या उत्तर भारतातल्या शहराची कथा

तसंच ते आणखी एका खजिन्यासाठीही ओळखलं जातं. पण हा खजिना लपलेला असून तो मिळवणंही अत्यंत कठिण आहे.

"त्यानं साडी जाळली आणि त्यातून निघालेल्या शुद्ध चांदीचा एक तुकडा आम्हाला दिला," असं माझ्या आईनं आम्हाला सांगितलं होतं.

तिच्या फिरोजाबाद येथील घरी 30 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचं ते वर्णन होतं. आईनं सांगितलेल्या गोष्टीतला माणूस म्हणजे एखादा जादूगार नव्हता, तर तो एक कारागिर होता.

आईच्या या शहरात असे अनेक कलाकार होते, जे घरोघरी जाऊन जुन्या साड्या गोळ्या करायचे. त्या साड्यांमधून मौल्यवान धातू ते काढायचे.

4. दुकानातून चिकन घरी आणल्यावर ते नळाखाली धुणं धोकादायक?

चिकनचा कोणताही पदार्थ करण्यापूर्वी चिकन धुणे धोकादायक असतं का? संशोधकांनी याचं उत्तर होकारार्थी दिलेलं आहे.

चिकन न धुता शिजवणं धोकादायक असल्याचं आपल्याला वाटतं. पण खरंतर बाजारातून आणलेली चिकन वाहत्या नळाखाली धुण्यातही काही धोके असू शकतात.

चिकन दुकानातून आणल्यावर सर्वप्रथम ते स्वच्छ धुण्यात येतं. त्यानंतर त्यापासून आवडता पदार्थ तयार केला जातो.

5. भारताचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न सेमीफायनलमध्ये भंगलं; हरमनप्रीत-जेमिमाची झुंज ठरली व्यर्थ

ऑस्ट्रेलियाने केप टाऊन इथे झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत भारतावर 5 धावांनी विजय मिळवत सातव्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठली.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी अफलातून खेळी करत भारताचा विजय दृष्टिक्षेपात आणला होता.

मात्र मोक्याच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत धावचीत होणं भारतीय संघासाठी दुस्वप्न ठरलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)