You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. सरकार सध्या स्थिर; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे परिणाम काय?
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणारा सर्वोच्च न्यायालयातला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत निर्णय आला.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं सर्वानुमते घेतलेला निकाल वाचून दाखवला.
20 जून 2022 च्या मध्यरात्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि त्यांच्या सोबत काही आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले.
थोड्याच अवधीत त्यांच्या मागे जाणा-या सेना आमदारांची संख्या 40 झाली आणि त्याचे पर्यावसन उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद जाऊन 'महाविकास आघाडी' सरकार जाण्यात झाली. त्यानंतर भाजपा प्रवेश करती झाली आणि शिंदे भाजपाच्या साथीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
या बंडाच्या पहिल्या टप्प्यापासूनच हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आणि एका मागोमाग एक आठ याचिका शेवटापर्यंत दाखल झाल्या. या सगळ्यांची एकत्रच सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं केली.
2. स्विगी, झोमॅटोपेक्षा स्वस्तात अन्न...तेही सरकारच्या मदतीने? कुठे आणि कसं मिळणार?
तुम्ही सहसा जेवण ऑर्डर करायला स्विगी किंवा झोमॅटो वापरता, टॅक्सीसाठी ओला किंवा उबर आणि शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा किंवा आणखी काही... आता कल्पना करा तुम्हाला या सगळ्या ऑनलाईन ॲप्सची तुलना एकाच ॲपवर करता आली तर? आणि जर ते ॲप सरकारी असेल तर?
असंच काहीसं घडतंय कारण गेल्या काही दिवसांपासून एका शब्दाची कायम चर्चा होतेय, तो म्हणजे ONDC.
ONDC म्हणजे Open Network for Digital Commerce. ही देशात ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या ॲप्ससाठी एक प्रणाली आहे, जी खुद्द भारत सरकारने तयार केली आहे.
3. नाशिकमध्ये 151 उंट दाखल होण्यामागचं रहस्य काय?
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून उंटांचे जत्थेच्या जत्थे दाखल होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, दाखल झालेल्या उंटांच्या कळपातील 111 उंट अत्यंत अशक्त आणि कुपोषित दिसून येतात.
पोट खपाटीला गेलेले, थकलेले, त्राण गळालेले, पायांवर जखमा असलेल्या अवस्थेतील हे रुग्ण निदर्शनास आल्यानंतर प्राणी मित्रांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.
सदर उंटांबरोबर क्रूर व्यवहार झाल्याचे दिसत असल्याने सर्व उंटांची रवानगी नाशिकच्या पांजरापोळमध्ये करण्यात आली.
4. मणिपूर का पेटलंय?- जाणून घ्या 7 प्रश्नं, 7 उत्तरं
मणिपूर या ईशान्येकडच्या राज्यात संघर्ष पेटला आहे. परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे वादाला तोंड फुटलं हे समजून घेऊया.
मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालींचे निमित्त झाले आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला.
मणिपूरमध्ये 34 अनुसूचित जमाती आहेत. त्यातील बहुतांश नागा आणि कुकी समुदायांतील आहेत.
राज्यात बहुसंख्येने म्हणजे सुमारे 64 टक्के लोकसंख्या असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा हवा आहे.
ही मागणी जुनीच आहे. पण, उच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
5. थॅलेसेमिया हा आजार काय असतो? त्याच्यावर कसे उपचार केले जातात?
थॅलेसेमिया (Thalassaemia) या आजाराचं नाव आणि त्याचे रुग्ण यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. परंतु त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसते.
थॅलेसेमिया ही एक आरोग्याची अवस्था आहे. किंवा अनेक अवस्थांचा समूह आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तामधील हिमोग्लोबिनवर परिणाम करणारी अवस्था निर्माण झालेली असते.
आपल्या रक्तामध्ये प्लाझ्मा, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स असतात.
रक्ताची सर्व पेशी आणि उतींना ऑक्सिजन पुरवणं, त्यांना उपयुक्त अन्नद्रव्यं पुरवणं, शरीरातील कार्बन डाय ऑक्साईडसारख्या त्याज्य गोष्टी बादूला करणं, संसर्गापासून रक्षण करणं अशी अनेक कामं असतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)