सिद्धेश लोकरे : महाराष्ट्रातल्या शाळांना भेट देऊन स्थिती समजून घेणारा तरुण, आता त्याचा पुढचा प्लॅन काय?

सिद्धेश लोकरे : महाराष्ट्रातल्या शाळांना भेट देऊन स्थिती समजून घेणारा तरुण, आता त्याचा पुढचा प्लॅन काय?
Published

मुंबईच्या सिद्धेशने नुकतंच महाराष्ट्रातल्या 30 शाळांना भेटी दिल्या आणि तिथल्या शिक्षणाची परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली.

सिद्धेश आणि त्याच्या टीमने तयार केलेल्या व्हीडिओंना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.

या माध्यमातून निधी गोळा करून भेट दिलेल्या शाळांचा कायापालट करणे, हा त्यांचा पुढचा उद्देश आहे. पण सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील शाळांवरच लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा त्याला कशी मिळाली?

  • शूट - शाहीद शेख
  • रिपोर्ट, एडिट - गणेश पोळ