You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख...
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. नव्या आर्थिक वर्षात या 3 गोष्टी करुन तुम्ही पैसे वाचवू शकता..
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. आपली वेगवेगळी गुंतवणूक, त्यातून मिळणारा परतावा आणि भविष्यात मिळणारा परतावा या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एप्रिल महिना अतिशय योग्य ठरतो.
कारण, एप्रिल महिन्यातच अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेले नवे बदल, नियम आणि कायदे लागू करण्यात येत असतात. त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिना अतिशय महत्त्वाचा आहे.
नव्या आर्थिक वर्षांत आर्थिक स्वयंपूर्णता मिळविण्यासाठीचा पाया तुम्हाला एप्रिल महिन्यात घालता येतो.
त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाचं नियोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. या निमित्ताने खालील 3 गोष्टींचा घेतलेला आढावा –
2. IPL : 52 दिवस, 10 संघ, 74 सामने, जाणून घ्या कोण आहे कुठल्या संघात...
31 मार्च 2023 पासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये 13 टीम्स खेळणार आहेत. त्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, पंजाब किंग्स, सनराइजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स और गुजरात टायटन्स.
यावेळी एकूण 74 मॅच खेळल्या जाणार आहेत. त्यापैकी 70 लीग मॅच आणि 4 प्लेऑफ होणार आहेत.
अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदाराबाद, बेंगलुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला अशा एकूण 12 शहरांमध्ये यंदाच्या मॅचेस होणार आहेत.
3. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, वाचा राज्य सरकारच्या गाईडलाईन्स
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे.
गेल्या 24 तासांत राज्यात 483 कोव्हिडबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 3 जणांच्या मृत्यूची माहिती समोर आल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,506 इतकी असून गेल्या 24 तासांत 317 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
4. स्टँप ड्युटी म्हणजे काय? 1 एप्रिलपासून त्यात काय बदल होऊ शकतात?
नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना म्हणजे 1 एप्रिलपासून काही गोष्टींमध्ये बदल होतो. यातला एक महत्त्वाचा बदल असतो स्टँप ड्युटीच्या दरांमध्ये.
स्टँप ड्युटी म्हणजे काय? ती कधी भरावी लागते? घर विकत घेतानाच्या खर्चावर स्टँप ड्युटीचा काय परिणाम होतो? आपण समजून घेऊयात.
स्टँप ड्युटी म्हणजेच - मुद्रांक शुल्क. मालमत्तेशी सबंधित कोणताही व्यवहार करताना हे मुद्रांक शुल्क भरावं लागतं. तुम्ही घर घेतलं किंवा व्यावसायिक वापरासाठी जागा घेतली तर स्टँप ड्युटी भरावी लागते. ही ड्युटी राज्यामध्ये महानगरं - शहरं - गावं यांच्यासाठी वेगवेगळी असते.
5. मेटल डिटेक्टरच्या मदतीने सापडला साडेचार किलो वजनाचा सोन्याचा दगड
बजेट मेटल डिटेक्टरच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला जॅकपॉट लागला आहे. त्याला चक्क 4.6 किलोचा एक दगड सापडला ज्यामध्ये सोन्याचा अंश होता.
या सोन्याची किंमत थोडीथोडकी नाही, तर 1लाख 60 हजार अमेरिकन डॉलर्स आहे. (अंदाजे 1.31 कोटी रुपये)
या व्यक्तीला स्वतःची ओळख उघड करायची नाहीये. त्यांना हा दगड ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरियातल्या सोन्याच्या खाणीत सापडला.
सन 1800 मध्ये ऑस्ट्रेलियात जेव्हा सोन्याच्या खाणी सापडल्या, तेव्हा व्हिक्टोरिया हे ठिकाण या ‘गोल्ड रश’च्या केंद्रस्थानी होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)