You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठीवर प्रसिद्ध झालेल्या या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. 1960 साली ‘मुंबई’ महाराष्ट्रानं मिळवली, मग ‘बेळगाव’ का मिळालं नाही?
बेळगावात कन्नड रक्षक वेदिका संघटनेनं केलेल्या हिंसक आंदोलनानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फोडलंय. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. या निमित्तानं या वादाच्या ठिणगीचा इतिहास समजून घेऊ. ज्या बेळगावातून 1946 साली पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला गेला आणि पुढे त्या ठरावानुसार लढून ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ मिळवला गेला, ते ‘बेळगाव’ मात्र महाराष्ट्रात येऊ शकलं नाही, ही बोच महाराष्ट्रीयांच्या मनाला गेल्या 60 वर्षांपासून लागून आहे. 60 वर्षांपूर्वी अशा कोणत्या घटना घडल्या, ज्यामुळे बेळगाव महाराष्ट्राला मिळालं नाही? या प्रश्नाचं उत्तर आपण या वृत्तलेखातून जाणून घेऊ. तत्पूर्वी, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा’च्या स्थापनेदरम्यानच्या महत्त्वाच्या घटनांवर एक धावती नजर टाकू.
2. अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ कसा बनवला?
गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसनंतर तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलेल्या ‘आप’ला मतांची टक्केवारी मात्र लाभदायक ठरलीय. कारण या मतांच्या टक्केवारीवरच ‘आप’चा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
पण हे कसं शक्य झालंय, आपचा आजवरचा प्रवास कसा राहिला, ते या बातमीत पाहूया.
3. चालता-फिरता अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण का वाढलं आहे?
हल्ली चालता चालता, डान्स करताना हार्टअटॅकला बळी पडलेल्या लोकांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशाच एका व्हीडिओमध्ये एक व्यक्ती लग्नात नाचता नाचता घेरी येऊन जमिनीवर पडते, तर दुसऱ्या एका व्हीडिओत एका कार्यक्रमात एक मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन जात असताना चक्कर येऊन पडताना दिसते. असे असंख्य व्हीडिओ व्हायरल होत असताना ट्विटरवर #heartattack हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागलाय.
या वाढत्या घटना कार्डियाक अरेस्टच्या असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण, कार्डियाक अरेस्ट आहे हे कसं ओळखायचं? जाणून घेऊया या बातमीत.
4. प्रियंका चोप्रा: 'मला बॉलिवुडमध्ये काळी मांजर, डस्की म्हणून हिणवलं गेलं'
अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने बीबीसी 100 Women ला सांगितलं की तिला 22 वर्षांत पहिल्यांदा तिच्याबरोबर असलेल्या पुरुष सहकलाकारांइतकं मानधन मिळालं आहे. अमेरिकन सिरीज सीटाडेल या सीरिजमध्ये तिला हे मानधन मिळाल्याचं सांगितलं. प्रियंका अतिशय यशस्वी अभिनेत्री आहे. तिने 60 पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. दहा वर्षांपूर्वी तिने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तिथे ठसा उमटवणाऱ्या तुरळक अभिनेंत्रींपैकी ती एक आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने बॉलिवुडमध्ये वर्ण-रंगाहून मिळणारी वागणूक, स्त्री-पुरुष कलाकारांच्या मानधनातील तफावत अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. कोणते आहेत हे मुद्दे, वाचा ही बातमी.
5. FIFA World Cup : रोनाल्डोच्या करिअरचा सूर्य मावळतीला? पोर्तुगालच्या टीमला त्याची गरज नाही?
सध्या फुटबॉल जगतात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची चर्चा जोरावर आहे. त्याच्या नावाची चर्चा त्याच्या परफॉर्मन्समुळे असते. पण यावेळी स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या या स्टार प्लेयरला मैदानात उतरवलंच नाही. त्यामुळे त्याच्या नावाच्या चर्चांनी वेग धरलाय. याआधी मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश क्लबला रोनाल्डोची गरज नसल्याचे संकेत मिळाले होते. पण आता कतारमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकप मध्ये पोर्तुगालने सुद्धा रोनाल्डोला बाहेर बसवून त्याची गरज नसल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे रोनाल्डोच्या करिअरचा सूर्य मावळतीला चाललाय का? जाणून घेऊया या बातमीतून.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)