श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबने तिचे तुकडे करण्यापूर्वी गुगलवर नेमकं काय सर्च केलं होतं?

व्हीडिओ कॅप्शन, दिल्ली खून प्रकरण : श्रद्धाचे तुकडे करण्यापूर्वी त्याने गुगलवर काय सर्च केलं?
श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबने तिचे तुकडे करण्यापूर्वी गुगलवर नेमकं काय सर्च केलं होतं?
Published

वसईची तरुणी पूजा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलाय. या घटनेतला प्रत्येक प्रसंग आणि त्याची माहिती तुम्हाला विचलित करू शकते.

इतक्या भयानक पद्धतीने हे कृत्य केलं गेलंय. आफताब अमीन पूनावाला या तरुणाने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे दिल्लीतल्या मेहरोली इथल्या जंगलात फेकून दिले.

मात्र, त्याने हत्या करून तिच्या मृतदेहाचे हे तुकडे फ्रीझमध्ये भरून ठेवले होते आणि तो रोज ते रात्री उशिरा घराबाहेर पडून फेकून यायचा.

आफताब सध्या दिल्ली पोलिसांच्या अटकेत असून पोलीस १५ नोव्हेंबरला आफताबला मेहरोलीच्या जंगलात घेऊन गेले. पोलीस आता आफताबसह या जंगलात तिच्या शरीराच्या तुकड्यांचा शोध घेतायत.

मात्र, आफताबने याही पुढे जाऊन अनेक प्रकार केलेत. त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगलचीही मदत घेतली.

हेही पाहिलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)