अभिनेत्री तबस्सूम गोविल काळाच्या पडद्याआड

तबस्सूम
Published

 प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल (78) यांचं शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झालं.  त्यांचं निधन कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचं त्यांचे पुत्र होसांग गोविल यांनी बीबीसीच्या सहयोगी पत्रकार सुप्रिया सोगले यांना सांगितलं.

 शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता त्यांना सलग दोन कार्डिअॅक अरेस्ट आले. 1947 साली बालकलाकार म्हणून काम सुरू केले होते.

त्यांचा फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम 1972-1993 या काळात भरपूर प्रसिद्ध झाला होता. लहानपणचे त्यांच्या भूमिका बेबी तबस्सुम नावाने प्रसिद्ध झाल्या होत्या. 

 गेल्या काही काळात त्या युट्यूबवर तबस्सुम टॉकिज नावाचा कार्यक्रमही चालवत होत्या. 

मेरा सुहाग, मंजधार, बारी बेहेन, बैजू बावरा अशा अनेक सिनेमांतून त्यांनी काम केले होते.  

अमिताभ बच्चन यांनी दिलं होतं जीवनदान

तबस्सूम यांनी 2014 मध्ये रेडिफ.कॉम या वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यांच्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या टॉक शो मध्ये अमिताभ कधीच आले नाहीत. मात्र अमिताभ यांनी तबस्सूम यांना एका जीवघेण्या प्रसंगातून वाचवलं होतं.

एकदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांचा एक कार्यक्रम चालू होता. कार्यक्रमाला कल्याणजी आनंदजी होते. तेव्हा सभागृहात अचानक आग लागली आणि हलकल्लोळ माजला. तेव्हा तबस्सूम यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्या व्हीलचेअरवर होत्या. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. आज अमिताभ बच्चन यांच्यामुळे मी जिवंत असं त्या सांगत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

कार्डिअॅक अरेस्ट नेमका काय असतो?  

कार्डिअॅक अरेस्ट हा शब्द आपण अनेकदा ऐकला असला, तरी त्याचा अर्थ अनेकांना माहिती नसतो.

Heart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं तेव्हा शरीराकडून त्याविषयी कुठलाही संकेत मिळत नाही. याचं मुख्य कारण हृदयात होणारी इलेक्ट्रिकल गडबड आहे, जी हृद्याच्या ठोक्यांचं ताळमेळ बिघडवते.

यामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात.

अशा वेळी काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. 

 'कार्डिअॅक अरेस्ट'मध्ये मृत्यू नक्की?

अमेरिकेत प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर सौरभ बंसल यांनी बीबीसीला सांगितलं, "खरं तर कार्डिअक अरेस्ट हा प्रत्येक मृत्यूचा अंतिम क्षण म्हटला जाऊ शकतो. याचा अर्थ आहे हृदयाचे ठोके बंद पडणे आणि मृत्यूचं कारणही हेच असते." पण याचं कारण काय असावं? डॉक्टर बंसल म्हणतात, "याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सामान्यपणे याचं एक प्रमुख कारण हे मोठा हार्टअटॅक असू शकतं" ब्रिटिश हार्ट फाउंडेशनुसार, हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये अडचणी उद्भवल्यानंतर शरीराच्या इतर भागांत रक्तपुरवठा होऊ शकत नाही आणि हीच प्रक्रिया कार्डिअॅक अरेस्टचं स्वरूप घेते. जेव्हा हृदय रक्ताचं पंपिंग बंद करतं, तेव्हा मेंदूतील ऑक्सिजनचं प्रमाणही घटतं. अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि श्वास घेता येत नाही.  

याची काही लक्षणं असतात का?

सगळ्यांत मोठी अडचण हीच आहे की, कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. हेच कारण आहे की, कार्डिअॅक अरेस्टमध्ये मृत्यू येण्याचा धोका कैक पटींनी वाढतो. यात सर्वसाधारण कारण हे असामान्य हार्ट ऱ्हिदम असल्याचं म्हटलं जातं. ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'वँट्रिकुलर फिब्रिलेशन' म्हटलं जातं. कार्डिअॅक अरेस्टची अनेक कारणं असू शकतात. 

पण हृदयविकाराशी निगडीत आरोग्य समस्या याविषयीची शक्यता वाढवतात : 

  • कोरोनरी आर्टचा आजार
  • हार्ट अटॅक 
  • कार्डियोमायोपॅथी 
  • काँजेनिटल हार्टचा अजार 
  • हार्ट वॉल्वमधील अडथळे 
  • हार्ट मसल्समधील इन्फ्लेमेशन 
  • लाँग क्युटी सिंड्रोमसारखे डिसऑर्डर 

याशिवाय इतरही काही कारणं आहेत, जे कार्डिअॅक अरेस्टला निमंत्रण देऊ शकतात :

  •  विजेचा झटका बसणं 
  • प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज घेणं हॅमरेज,
  • ज्यात रक्तस्राव होतो पाण्यात बुडणं  

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)