You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रान्समॅन जेव्हा एका मुलीच्या प्रेमात पडतो
ट्रान्समॅन जेव्हा एका मुलीच्या प्रेमात पडतो
Published
22 वर्षांचा ट्रान्समॅन आसिफ आणि त्याची 21 वर्षांची प्रेयसी समीना या दोघांना घरच्यांच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी गावातली घरं सोडून शहरात येऊन राहावं लागलं. त्यांच्यासारख्याच आणखी दोन जोडप्यांबरोबर त्यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. त्यांची मागणी आहे की घरच्यांच्या हिंसाचारापासून जीव वाचवून मुक्तपणे आणि सुरक्षित आयुष्य जगता यावं यासाठी समलिंगी लोकांना विवाहाचा कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने एप्रिल मे महिन्यात अशा 21 याचिका सुनावणीसाठी घेतल्या. सरकारची बाजू ऐकून घेतली गेली, लवकरच यावर निर्णय येण्याची अपेक्षा आहे.