You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रपुरात रेल्वे ब्रिजचा भाग कोसळला, 7 जण जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्टेशनमधील ब्रिजचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडलीय. आज (27 नोव्हेंबर) संध्याकाळी 5.10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
बल्लारशाह रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवरून दोनवर जातानाच्या ब्रिजवर ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघाजणांना किरकोळ दुखापत झालीय.
तर सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यातील दोघांवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.
जखमी असलेल्या 7 जणांना चंद्रपूर स्टील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलंय.
या 7 जणांचा उपचार सुरू –
- रंजना खरतड – ICU मध्ये
- निलिमा रंगारी – ICU मध्ये
- छाया भगत - सामान्य वॉर्ड
- सान्वी पाटील - सामान्य वॉर्ड
- निधी भगत - सामान्य वॉर्ड
- चैतन्य भगत - सामान्य वॉर्ड
- अंजली वर्मा - सामान्य वॉर्ड
बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात आहे. नागपूर मध्यरेल्वेच्या विभागाच्या अंतर्गत हे रेल्वेस्थानक येतं.