हम रहें या ना रहें कल... हेच ठरलं केकेचं अखेरचं गाणं

Published

हम रहें या ना रहें कल... हेच केकेचं अखेरचं गाणं ठरलं. कोलकात्यातल्या नझरुल मंच इथे केकेंनी त्याच जादुई आवाजात हे गाणं गाऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. मात्र, यानंतर काही तासांतचं त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

हम रहें या न रहें कल हे केकेंचं गाणं मनात साठवून घरी पोहोचलेल्या चाहत्यांना ते गेल्याच्या बातमीचा धक्का बसला.

बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांचं कोलकात्यात निधन झालं. केके त्यावेळी एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात होते. मात्र तिथेच त्यांना अवस्थ वाटल्याने त्यांना प्रथम त्यांच्या हॉटेलवर आणि नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

हॉस्पिटलमध्ये आणताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)