You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजी राजेंचा राज्यसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला कारण... | सोपी गोष्ट 604
Published
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती उत्सुक आहेत, पण त्यांना उमेदवारीही द्यायची नाही त्यांना विरोधही करायचा नाही, अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतल्याचं चित्र आहे.
राज्यसभेसाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे, तर संभाजीराजेंना असं वाटतं की महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा. तेव्हा संभाजीराजे हे शिवबंधन बांधणार की स्वतंत्र राहणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नेमकी या निवडणुकीतली समीकरणं काय आहेत?