घटस्फोटित आईचं मुलांनी दुसरं लग्न लावून दिलं तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, घटस्फोटित आईचं मुलांनी दुसरं लग्न लावून दिलं तेव्हा...
Published

आपल्या मुलीच्या लग्नाचा जेवढा आनंद पालकांना होतो तेवढाच आनंद श्रेया आणि समीर यांना त्यांच्या आईच्या लग्नाचा झाला आहे. सोनी सोमानी या त्यांच्या दोन मुलांसोबत मुंबईत राहतात.

नुकतंच सोनी यांचा विवाह पार पडला. या विवाहाचे फोटो श्रेयाने ट्वीटरवर ट्वीट केले आणि हा विवाह चर्चेचा विषय बनला. आईच्या लग्नाबद्दल सांगताना श्रेयाचा आनंद गगनात मावत नव्हता. एखाद्या आईला तिच्या मुलीला कसा जोडीदार मिळतो याची चिंता असते, काहीशी तशीच चिंता मला होती असं श्रेया सांगत होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)