'साध्वी' सावित्रीबाई फुले नावावरून पुण्यात का गोंधळ झाला?

Published

पुण्यातील एका बागेला ‘साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान’ असे नाव होते. त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी त्याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहीत सावित्रीबाई फुले यांच्या नावासमोर ‘साध्वी’ या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेतला.

त्यानंतर हे नामकरण 4 जानेवारी 1991 ला कॉंग्रेसच्या काळात केले गेले असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सरोदे यांच्या लक्षात आणून दिले. कोणाचीही सत्ता असताना हे नाव दिले असले तरी आता हे नाव बदलण्यात यावे अशी मागणी सरोदे यांनी केली.

सरोदे यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. समता सैनिक दलाच्या काही कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्रीच त्या फलकावरील साध्वी हा शब्द पूसून टाकला. तसेच ‘ज्ञानज्योती’ सावित्रीबाई फुले उद्यान असा नवीन फलक त्यांनी लावला.

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)