'नवऱ्याने माझ्या चेहऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर दिवस की रात्र मला काहीच कळेनासं झालं'

व्हीडिओ कॅप्शन, नवऱ्याने माझ्या चेहऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर दिवस की रात्र मला काहीच कळेनासं झालं.
Published

अफगाणिस्तान हा जगभरात महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश समजला जातोय. गेल्या वर्षभरात देशात महिलांवरील हिंसाचाराच्या 3 हजार 500 गंभीर केसेस झाल्या.

सध्या देशात असलेली राजकीय अस्थिरता पाहाता हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. शकीला झरीन या आता 25 वर्षांच्या आहेत. पतीने त्यांच्या चेहऱ्यावर गोळी झाडल्यानंतर त्या मरणाच्या दारातून परत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर 22 शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)