Pune Fire: पुण्यात सॅनिटायझर फॅक्टरीच्या आगीत नवरा वाचला, बायको दगावली

Published

पुण्याजवळच्या पिरंगुट गावात केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत लक्ष्मी मरगळे यांचा मुलगा थोडक्यात बचावला. मात्र त्यांची सून मंगल मरगळे या आगीत दगावल्या. मंगल यांचा कंपनीतील कामाचा हा पहिलाच दिवस होता. पण पहिल्याच दिवशी त्यांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं.

आग इतकी भयंकर होती की भिंती फोडून अडकलेल्यांना बाहेर काढावं लागलं.

आतापर्यंत 18 मृतदेह इथून बाहेर काढण्यात आले आहेत. काही मृतदेह ओळख पटण्यापलीकडे कोळसा झालेले होते.

रिपोर्ट - राहुल गायकवाड

कॅमेरा - नितीन नगरकर

एडिटिंग - सुयोग रेडिज

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)