परशुराम गंगावणे: पद्म पुरस्कार विजेते, कळसुत्री बाहुल्यांमधून लोककथा सांगणारे लोककलाकार

Published

काळाच्या ओघात लोप पावलेल्या आदिवासी लोककला जपण्याचं काम परशुराम गंगावणे करतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात राहणारे परशुराम वयाच्या 12व्या वर्षांपासून कळसूत्री बाहुल्यांचे खेळ सादर करतायत.

त्या काळी कळसूत्री बाहुल्या नाचवत अनेक लोककथा सांगितल्या जायच्या. वडिलोपार्जित चालत आलेली ही कला जपणाऱ्या गंगावणेंना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पाहू या त्यांची प्रेरणादायी कहाणी

रिपोर्ट – स्वाती पाटील

कॅमेरा – शरद पाटील

एडिटिंग – अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)