You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनमधल्या वुहान शहरात 'कोरोनावरचा विजय' का साजरा केला जातोय?
चीनमधल्या वुहान शहरातली ही आताची परिस्थिती आहे. ट्रॅफिक जाम आणि गजबजलेले रस्ते.
पण गेल्यावर्षी जानेवारीत हेच ठिकाण कोरोना साथीचा केंद्र बनलं होतं. याच ठिकाणाहून कोरोना विषाणूचा उगम झाल्याचं सांगितलं जातंय. आता एक वर्षानंतर हे शहर परत रुळावर येतंय. पण सध्या इथं एक वेगळीच चर्चा सुरू आहे.
'हा विषाणू दुसऱ्या देशांतून आलाय. आम्ही त्याचे बळी ठरलो आहोत,' असं या दुकानदार सांगत आहेत. यात भर म्हणून विषाणू दुसरीकडूनच आला आहे अशा प्रचाराला अधिकृतरित्या पाठिंबा पण मिळत आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)