जो बायडन: अमेरिकेत सत्ता हस्तांतरणासाठी 2 महिने का लागतात? #सोपी गोष्ट 256
कोरोनाचा सगळ्यांत मोठा फटका बसला तो अमेरिकेला. एकीकडे कोरोनाचं संकट होतं तर दुसरीकडे त्याच काळात राष्ट्राध्यक्षीय निवडणुका पार पडल्या. जो बायडन यांनी बाजी मारली खरी पण डोनाल्ड ट्रंप यांनी सहजासहजी हारही मानली नाही.
20 जानेवारीला जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. या दिवसाला इनॉगरेशन डे असं म्हणतात. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यापासून जानेवारीमध्ये शपथविधी होई पर्यंत एक काळ असतो त्यात सत्ता हस्तांतरीत करायची असते.
पण ट्रंप यांनी ही प्रक्रिया तितकी सोपी होऊ दिली नाही. असं नेमकं काय घडलं की ट्रंप यांनी बायडन यांच्यासमोर इतके अडथळे निर्माण केले? आणि मुळात हे सत्ता हस्तांतरण म्हणजे नेमकं काय? याचबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...
संशोधन – ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)