मुंबईच्या किनाऱ्यावर राहणारी मलिशा जेव्हा सुपर मॉडेल बनायचं स्वप्न पाहते
Published
मलिशा आणि तिचं कुटुंब मुंबईतल्या वांद्रेजवळच्या समुद्र किनाऱ्याजवळ राहतात. मलिशाचे वडील कुटुंबासहित कामानिमित्त गुजरातहून मुंबईला स्थलांतरीत झाले आहेत. ती जवळच्या सरकारी शाळेत शिकते. मलिशा एकदम व्यवस्थित इंग्लिशमध्ये बोलते. ते पाहून अनेकजण चकीत होतात. एक दिवस मलिाशाला सुपर मॉडेल आणि डान्सर बनायचं आहे. ती सध्या इन्स्टाग्राम लोकप्रिय झालीये. यामागं एक हॉलिवूडचं कनेक्शन आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)