पुतिन विरोधकाला रशियात येताच अटक

Published

गेली अनेक वर्षं व्लादिमिर पुतिन यांचे विरोधक असणारे अॅलेक्सी नवालनी रशियात परत आले. विषप्रयोग झाल्यानंतर ते जर्मनीत उपचार घेत होते. पण रशियात पाऊल टाकताच त्यांना पोलिसांनी अटक केली. नवालनी यांनी त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगामागे रशियन गुप्तहेर असल्याचं म्हटलं होतं. पण पुतिन यांनी हे आरोप फेटाळलेत. आधी विषप्रयोग आणि मग अटक झालेला हा रशियातला विरोधी पक्षाचा राजकारणी आहे तरी कोण?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)